पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील शहापुरे येथील गरोदर माता अत्यवस्थ अवस्थेत शहरातील एका हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म देतांना देवरुपी डॉक्टरांनी स्वतः चे रक्तदान करुन मातेचा जीव वाचविला आहे.
तालुक्यातील शहापुरे येथील स्विटी अविनाश खरे ही गरोदर माता अत्यवस्थ अवस्थेत शहरातील हॉस्पिटलचे दार ठोठावत असतांना रुग्णाची गंभीर अवस्था बघुन जळगावी जाण्याचा सल्ला मिळाला. रुग्णाची अवस्था बिकट होती. रक्ताचे प्रमाण ४ टक्के तर प्लेटलेट १७ हजार अशा क्रिटिकल अवस्थेत रुग्णाचे सासरे अर्जुन खरे यांना कुठे जावे हे कळत नव्हते. रात्रीचे बार वाजले होते. यावेळी खरे यांचे शहरातील नातेवाईक अरुण ब्राह्मणे मदतीला धावून आले. त्यांनी ही बाब नंदु सोमवंशीसह कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना सांगितल्यावर सोमवंशी यांनी तात्काळ लिलावती हॉस्पिटलचे डॉ. वैभव सुर्यवंशी यांना विंनती करुन रुग्णाचे जीवाचे कमीजास्त झाल्यास आम्हीच जबाबदार राहु आपण तात्काळ उपचार सुरू करा. डॉ. सुर्यवंशी यांना एक प्रकारे आव्हान होते. रक्ताचे प्रमाण कमी आणि त्यात कमी होणार्या प्लेटलेट त्यामुळे तात्काळ जळगाव येथुन दोन प्लेटलेट्सच्या पिशवी तर पेशन्टचे रक्तगट Ab पॉझिटिव्ह हा दुर्मिळ रक्तगट असल्याने मिळणे कठीण झाले होते. अशा अवस्थेत स्विटी खरेची प्रस्तुतीची वेळ आली. पेशन्ट अॉपरेशन करते वेळी योगायोगाने डॉ. सुर्यवंशी यांचा रक्तगट पेशन्टचा असल्याने स्वतः डॉ. सुर्यवंशी यांनी तात्काळ रक्तदान केले आणि स्विटी खरेसह तिच्या बाळाचा जीव वाचविण्यास यश मिळविले आहे.