धरणगाव (प्रतिनिधी) येथे आज होमिओपॅथी शास्त्राचे जनक डॉ. सॅम्युअल हनीमन यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात डॉ. रमेश पाटील, डॉ. शैलेश सूर्यवंशी, डॉ. चेतन भावसार, डॉ. पुष्कर महाजन, डॉ. सूचित जैन, डॉ. अक्षय भावे, डॉ. अमेया भावे, डॉ. निधी अमृतकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन डॉ. पंकज अमृतकर व डॉ. निधी अमृतकर यांनी आपल्या दवाखान्यात केले. होमिओपॅथी शास्त्राचे सध्याच्या महामारीतील योगदान या विषयावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर चौधरी यांनी मेहनत घेतली.
















