जळगाव (प्रतिनिधी) पुण्यात थैमान घातलेल्या गुईलेन बेरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचा पाचवा रूग्ण जिल्ह्यात आढळून आला असुन त्यास काल दि. २४ रोजी रात्री ११ वाजता जिल्हा शासकीय व वैदयकिय महाविदयालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात आता जीबीएस रूग्णांची संख्या ५ वर गेली असली तरी त्यातील दोन रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्हयात जीबीएसचा आढळून आलेला पाच रूग्ण हा दिपनगर, निंभोरा येथील २३ वर्षीय तरूण असुन त्याला उपचारासाठी काल रात्री दाखल करण्यात आले आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तीन रूग्णांवर उपचार सुरू आहे. पिंप्री येथील ४५ वर्षीय महिला व खिरोदा (रावेर) येथील २२ वर्षीय तरुणाला १० ते १२ दिवस उपचारानंतर दि. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी डिस्चार्ज करण्यात आला. तर रावेर येथील ९ वर्षीय बालिका व कोसगाव ता. यावल (सध्या जळगाव रामेश्वर येथे वास्तव) येथील पाच वर्षीय बालकावर जीएमसीतील बालविभागातील अतिदक्षता कक्षात उपचार सुरु आहे. दोन्ही जीबीएस रुग्णावर बालरोग तज्ज्ञ डॉ. बाळासाहेब सुरोसे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहे. दिपनगर निंभोरा (भुसावळ) येथील २३ वर्षीय तरुणावर जीएमसीतील उपचार सुरु झाले आहे.