धरणगाव (प्रतिनिधी) युग श्रेष्ठ,संत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांचे अनमोल रत्न, परम प्रभावक शिष्य, परम पूज्य मुनींश्री १०८ अक्षयसागर जी महाराज,मुनींश्री १०८ नेमीसागर जी महाराज,मुनींश्री १०८ शैलसागर जी महाराज,मुनींश्री १०८ अचलसागर जी महाराज, ऐलकश्री १०५ उपशमसागर जी महाराज व मुनींश्री १०८ दुर्लभसागरजी, मुनींश्री १०८ संधान सागरजी महाराज यांचे मिलन विद्या-भवनचा शिलान्यासाचा निमित्ताने धरणगाव येथे दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी चोपडा रोडवर झाले.
अनेक वर्षानंतर एवढे मुनींश्रींचे आगमन झाल्याने, जैन समाजात उत्साहाचे वातावरण तयार झाले. धरणगावच्या इतिहासात प्रथमच मिलनाचा कार्यक्रम झाला. डोळ्यात असा प्रसंग साठवून ठेवावा,असा प्रसंग होता. साधू-संत येति घरा, तोच दसरा दिवाळी अशीच प्रचिती याप्रसंगी सर्व भाविकांना आले. स्वागताच्या व मिलन समारोह वेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, महिला मंडळींनी केशरी रंगाच्या एकसारख्या साड्या परिधान केलेल्या होत्या तर पुरुष मंडळी सफेद रंगात कपडे परिधान केलेले होते. प्रत्येक घरासमोर व भ.महावीर चौकात भव्य रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या.
दोन दिवसीय कार्यक्रमात चोपडा, अमळनेर,पारोळा, एरंडोल, नशिराबाद, जळगाव,कोपरगाव, मलकापूर, व भोपाळ येथून अनेक भाविक आले होते. दुपारच्या सत्रात परम पूज्य मुनींश्रींच्या प्रवाचनांनी भाविक मंत्रमुग्ध झालीत. तसेच मुनींश्रींच्या सानिध्यात ब्र.जयवर्मा भैय्यांच्या हस्ते विद्या-भवन (यात्री निवास)चे शिलान्यास करण्यात आले. यासाठी दानवीर धर्मानुरागी श्री.सुभाष जैन,श्रीमती कल्पना डहाळे (यवतमाळ), श्री.किरणजी महाजन (चाळीसगाव), श्री.श्रीकांत सुधाकरजी डहाळे (औरंगाबाद), श्री.सुधीरजी पंडित (पुणे), श्री.स्वप्नील व सचिन जैन ह्यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी समाजातील सर्व जेष्ठ-श्रेष्ठ, तरुण,व महिला भाविक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.राहुल जैन,सचिव श्रेयान्स जैन,उपाध्यक्ष प्रतीक जैन,खजिनदार अजय महाजन,सदस्य सावन जैन,निकेत जैन,उदय डहाळे तसेच उत्सव मंडळाचे अध्यक्ष तनय डहाळे, सुयश डहाळे, मयंक जैन, पियुष डहाळे, सौरभ डहाळे,अक्षय जैन, प्रथम जैन, आयुष जैन,तथा डॉ.मिलिंदजी डहाळे, प्रा.अजित डहाळे, श्री.राजेश डहाळे,जितेंद्र जैन, नितीन जैन, निशांत जैन, सुजित जैन,सारंग जैन विवेक लाड,सुभाष जैन, प्रफुल्ल जैन, विनोद जैन, मनीष लाड, सारंग जैन, उदय डहाळे,मिलिंद डहाळे,पुनीत लाड, मनोज घारे व राजुलमती महिला मंडळाचे अनमोल सहकार्य मिळाले.












