चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालयात राष्ट्रीय स्वंयसेवक संघच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वर्गास आज खासदार रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन, शिबिराची माहिती घेतली तसेच आयोजकांशी संवाद साधला.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे* यांच्यासह शांताराम आबा पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, मनोज सनेर, भाजयूमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, घनश्याम अग्रवाल, संजय जैन, पंकज पाटील,प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.