मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारपदांसाठी शिफारस असलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंद लिफाफ्यात सादर झाली. यासंदर्भात तातडीने उद्या, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचेही याचिकादारांचे म्हणणे आहे.
तसेच यासंदर्भात तातडीने उद्या, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचेही याचिकादारांचे म्हणणे आहे. विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून साहित्य, कला, विज्ञान, सहकार चळवळ आणि सामाजिक सेवा या क्षेत्रात विशेष ज्ञान व अनुभव असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींची निवड होत असते. असा आक्षेप याचिकादारांनी आपल्या याचिकांत नोंदवला आहे. ‘कोणकोणत्या नावांची शिफारस केली आहे, अशी विचारणा न्यायालयाने पूर्वीच्या सुनावणीत केली असता, निवडीची प्रक्रिया रातोरात होणार नाही आणि याचिकादारांना त्याची माहिती कळेल, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते.
याचिकादारांनीही निवड अंतिम होण्यापूर्वी अशी नावे जाहीर करण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे आता केवळ मुख्यमंत्र्यांकडे बंद लिफाफ्यात नावे देण्यात आली आहे. तरी देखील आम्ही त्याला आक्षेप घेऊ’, असे याचिकादार दिलीपराव आवाळे व शिवाजी पाटील यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अँड. सतीश तळेकर यांनी सांगितले. याप्रश्नी सोमवारी तातडीने अर्ज करून ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या आमदार पदांसाठी आलेले अर्ज व प्रस्ताव, त्याविषयीची कागदपत्रे व शेऱ्यासह मुख्यमंत्र्यांकडे सादर झालेला तपशील, संबंधित इच्छुकांचे चारित्र्य व गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याची पडताळणी इत्यादी माहिती याचिकादारांनी माहितीच्या अधिकारात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे मागितली आहे. मात्र, ती माहितीही अद्याप देण्यात आलेली नाही’, असे तळेकर यांनी सांगितले.
















