पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील शेळावे गावात भीम जयंतीनिमित्त शस्त्रक्रिया शिबिर आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
धरणगाव गंगापूरी येथील जावई डॉ.अशोक बिऱ्हाडे हे पुण्याला डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आपल्या शेळावे या गावात शस्त्रक्रिया शिबिर आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. आरोग्य शिबीर आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.अशोक बिऱ्हाडे यांच्यासह समाजबांधवानी केले आहे.