धरणगाव (प्रतिनिधी) तालुका मराठा प्रबोधनी तालुक्यातील मराठा समाजातील इंदिरा गांधी कन्या विद्यालयाच्या मागील जागेवर वीस हजार गुंठे जागा समाजाची असून त्या ठिकाणी मंगल कार्यालयासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 50 लाख रुपये निधी दिला होता. त्याबद्दल मराठा समाजातर्फे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार व त्यांचे आभार मानण्यात आले.
लवकरच 4 ऑक्टोंबर रोजी भूमिपूजन संदर्भात मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी मराठा प्रबोधनीचे अध्यक्ष डॉ डी पी पाटील, उपाध्यक्ष डी जी पाटील साहेब, उपाध्यक्ष पी एम पाटील सर, सचिव डी आर पाटील सर, सहसचिव धनराज पाटील, सदस्य सी के पाटील, आनंदराव पवार, संजय पवार, सुभाष पाटील, निळकंठ पाटील, विजय पवार, रोहिदास पाटील, राजेंद्र गांगुर्डे, डी डी पाटील, भीमराज पाटील, राहुल पाटील, गुलाब मराठे, मोहन पाटील, किशोर पाटील, किरण पाटील, महेश पाटील, अखिल भारतीय मराठा सेवा संघ व मराठा प्रबोधनीचे तालुकाध्यक्ष गोविंद पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.