बुलढाणा (वृत्तसंस्था) स्थानिक धाड मार्गावरील स्त्री रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर यांना ४८ – हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी – (२३ डिसेंबर) रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी स्त्री रुग्णालयाच्या एका कंत्राटी डॉक्टरास तीन महिने कर्तव्य बजाविल्यामुळे एकूण सहा लाख रुपये वेतन मिळाले होते. मात्र, सदर कंत्राटी डॉक्टरास ड्युडी लावण्यावरून ८ टक्क्यांप्रमाणे ४८ हजार रुपये लाचेची मागणी स्त्री रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर यांनी केली होती. यासंदर्भात पैशाची मागणीची खात्री केल्यानंतर सदर डॉक्टराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड मार्गावरील एका हॉटेल परिसरात सापळा रचला. दरम्यान, या हॉटेलमध्ये संध्याकाळी ५.३० वाजता सदर कंत्राटी डॉक्टरकडून ४८ हजारांची लाख स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचसमक्ष डॉ. सचिन वासेकर यांना रंगेहाथ पकडले.
सदर कारवाई अमरावती परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळाप्रमुख पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार शाम भोंगे, विलास साखरे, प्रवीण बैरागी, मो. रिजवान, राजू क्षीरसागर, विनोद लोखंडे, जगदीश पवार, गौरव खत्री, शैलेश सोनवने, स्वाती वाणी अर्शद शेख आदींनी केली