धरणगाव (प्रतिनिधी) येथील गौतमनगर समाज सभागृहात राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली गेली. यामध्ये भ. गौतम बुद्ध, छ. शिवाजी महाराज, राष्ट्रपिता जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूज्य भदंत अमर ज्योती आणि भैय्यासाहेब सोनवणे यांचा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याच वेळी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे मुख्य संयोजक प्रा. डॉ. भरत शिरसाठ आणि चिंतामण जाधव यांचा माजी उपनगराध्यक्ष दिपकराव वाघमारे यांच्या हस्ते ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख संयोजक प्रा. डॉ. भरत शिरसाठ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी ते म्हणाले, “येत्या रविवारी, १६ मार्च २०२५ रोजी ‘संविधान नगरी कृष्णा हॉटेल मैदान’, एरंडोल येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्रातील तसेच सर्व संविधान प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”
कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्यांमध्ये उषाताई बाविस्कर, बबिताताई बागुल, बेबीताई गायकवाड, सविता गाढे, अजय सोनवणे, विक्रम वाघमारे, संतोष सोनवणे, मयूर भामरे, उदय मोरे, बबलू शिरसाठ, चंदू सोनवणे, अशोक मोरे, किरण सोनवणे, संकेत शिरसाठ, विजय गायकवाड, भुंडा पहिलवान, विवेक बाविस्कर, सुधाकर मोरे, कैलास पवार, लक्ष्मण पाटील, हेमंत माळी, प्रा. आकाश बिवाल, बी. डी. शिरसाठ, गोरख देशमुख, निलेश पवार, सुरज वाघरे, ॲड. रविंद्र गजरे, प्रदीप बाविस्कर, दिपक विजय वाघमारे, विजय सोनवणे, महेंद्र तायडे, उदय मोरे, आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र बागुल यांनी केले, तर राजेश बोरसे यांनी त्यांना आभार व्यक्त केले.