जळगाव (प्रतिनिधी) येथील रिंगरोड परिसरात तरुण जेवणानंतर शतपावली करत असतांना त्याच्या हातातून दुचाकीने आलेल्या दोन भामट्यांनी मोबाईल हिसकावून घेतला. ही घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, महावीर नीलेश कटारीया (वय १६, रा. एलआयसी कॉलनी) हा जेवणानंतर शतपावली करीत होता. यावेळी त्याच्या मागुन भरधाव दुचाकीने दोन भामटे आले. यातील मागे बसलेल्याने महावीरच्या हातातील मोबाईल हिसकाऊन घेतला. यानंतर दोघे भामटे गणेश कॉलनीच्या दिशेने पळुन गेले. याप्रकरणी महावीर याने दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.