जळगाव (प्रतिनिधी) जनतेच्या मदतीला भाजप आहे सोबतीला, या उक्तीप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित भव्य रक्तदान शिबिर ही काळाची गरज असून, सध्या कोरोना महामारीमध्ये असे शिबीर जागो जागी भरण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आज रावेर लोकसभेच्या खा. रक्षाताई खडसे यांनी केले.
शहरातील पुंडलिक बऱ्हाटे शाळेमध्ये आज भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबीरात त्या बोलत होत्या. खा. रक्षाताई खडसे पुढे म्हणाले सेवा, संघर्ष, समर्पण, संवाद, आणि सम्मान या पंचतत्वावर भाजपचे कार्य चालत असून नवनियुक्त युवा मोर्चाचे शहरातील पहिलेच शिबीर नियोजन बद्ध झाले आहे. यावेळी जळगाव ग्रामीण अध्यक्ष आ. राजुमामा भोळे, आ. संजय सावकारे, शहर अध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक वैद्यकीय आघाडीचे डॉ. नितु पाटील, सरचिटणीस रामाशंकर दुबे, अमोल महाजन, संदीप सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, उद्योगपती मनोज बियाणी, राजेंद्र चौधरी, कायदा आघाडी अध्यक्ष अँड. अभिजित मेने, अनुसूचित जाती अध्यक्ष राहुल तायडे, शैलजा पाटील, गिरीश महाजन, सतीश सपकाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी ४३ रक्तबॅग संकलन झाले असून प्रत्येक रक्तदात्याचा सन्मान करत त्यांना सर्टिफिकेट, स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक विचारपुस्तक, सॅनिटीझर बाटली, एन ९५ मास्क आदी भेट देण्यात आले.
यावेळी श्रेयस इंगळे, नंदकिशोर बडगुजर, अमित असोदेकर, गोपीचंद राजपूत, अथर्व पांडे, विनीत पाटील, राहुल मेरानी, अनुप पुरोहित, देवेश कुळकर्णी, प्रशांत भट, नेहल लढे, सोनू सचदेव, सागर जाधव, प्रणव डोलारे, स्वप्नील काळे, विजय डोंगरे, अमोल जोशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शेखर पाटील तर आभार अनिरुद्ध कुलकर्णी यांनी मानले.
युवा मोर्चा भाजप चे कवचकुंडले…
“ज्या ज्या वेळेस संकट उभे राहिले त्या त्या वेळेस युवा मोर्चा जनतेच्या सेवेसाठी धावत आला आहे. नवनियुक्त युवा कार्यकारणीचा हा पहिलाच उपक्रम असून आगामी उपक्रमास भुसावळ विधानसभा आ.संजय सावकारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.