जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिलखेडा गावातील घरांवरून पोलवरील विद्युत तारा जात होत्या. याची स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन दोनच दिवसात पोल व विद्युत तार गावबाहेरील रस्त्याच्या कडेला बसविण्यात आले आहे. या विद्युतदारांमुळे पुढील होणारा धोका आता टळला असून गावातील लोकांनी गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.
जळगाव तालुक्यातील पिलखेडा गावातील घरांवरून पोलवरील विद्युततारा लोंबकळत होत्या. मोठ्या पुढार्यांना गावातील लोकांनी ही समस्या सांगितली पण, फक्त आश्वासन मिळाले आणि आतापर्यंत ते काम कुणी केले नाही. मात्र, गावातील मंडळींनी गुलाबराव पाटील यांच्याकडे ही समस्या मांडताच त्यांनी तात्काळ दखल घेतली आणि दोन दिवसातच विद्युत पोल व तार गावाबाहेरी रस्त्याच्या कडेला बसविण्यात आले.
तसेच गावातील येण्याजाण्याच्या रस्त्यावर पावसामुळे खड्डे झाले आहे. त्यामुळे केळीच्या पाडा वाहून नेणाऱ्या गाड्या अडकत होत्या. यासाठी देखील गुलाबराव पाटील यांनी दखल घेऊन खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाच्या गाड्या पाठवत आहे. पिलखेडा येथील लोटन साळुंखे, अमोल साळुंखे, महेंद्र सोनवणे, दिलीप भिल, जितेंद्र सोनवणे, ईश्वर भालेराव, अशोक बागले, ईश्वर सोनवणे, गुरुदास साळुंखे, सुधीर साळुंखे, समाधान साळुंखे, आणि दीपक बाविस्कर कल्पेश सपकाळे यांनी गावातील समस्या गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडली होती.