बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आप, शेकाप संयुक्त महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ पुण्यातील वारजे, माळवाडी भागात खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आयोजित प्रचार रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्य रोहिणी खडसे यांनी सहभागी होऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदारांशी संवाद साधत सुप्रिया सुळे यांना निवडुन देण्याचे आवाहन केले.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या सध्याचे केंद्र व राज्यातील सत्ताधारी हे फसवेगिरी करणारे असुन गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांनी दिलेले सर्वच आश्वासने फोल ठरले असताना सुद्धा ते जाहिरातींच्या माध्यमातून खोटी गॅरंटी देत आहेत.
मागच्या वेळी त्यांनी गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्याचे आश्वसन दिले होते. ते कमी न होता आज रोजी सिलेंडरच्या भावात तिप्पटीने वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे दर कमी न होता ते गगनाला भिडले आहेत. देशातील प्रत्येक तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिले होते तरुणांना रोजगार मिळाले नसून
याउलट बेरोजगारीत वाढ झाल्याने तरुण वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. देशातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. देशात मणिपूर,हाथरससारख्या घटना घडून सत्ताधारी त्यावर चुप्पी साधुन आहेत उलट वारंवार महिलांविषयी अपमानजनक वक्तव्य करत आहेत. त्यामुळे महिला भयभीत झालेल्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते परंतु महागाई कमी न होता महागाईने उच्चांक गाठला आहे.
जिवनाश्यक वस्तूंच्या दरात झालेल्या वाढीने गृहिणींना प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न पडला आहे. शेतकरी बांधवांना शेतमालाला दुप्पट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. ते मिळाले तर नाहीच पण उत्पादन खर्च निघण्या एवढा पण शेतमालाला भाव नाही,शेतमालावर निर्यात बंदी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल मातीमोल भावात विकावा लागतो आहे. याउलट शेती साठी लागणारे खत व इतर शेतीपयोगी वस्तूंवर जि एस टी लावल्याने त्याचे दाम शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेर गेले असल्याने भविष्यात शेती कशी करायची या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. महागाई, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षितता सर्व पातळीवर सत्ताधारी अपयशी ठरले असुनसुद्धा मोदींजींची गॅरंटी च्या नावाखाली
मोठं मोठ्या जाहिरातीच्या माध्यमातून आपले अपयश झाकून शरद पवार यांनी काय केले हे विचारत आहेत?. शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना फलोत्पादन योजना आणली ओसाड जमिनीवर फळबागा फुलवल्या शेतकऱ्यांना हमीभावात वाढ दिली कर्जमाफी दिली, शेतमाल निर्यातीला चालना दिली, त्यामुळे धान्य आयात करणारा देश गहू, तांदूळ व इतर धान्याचे विक्रमी उत्पादन करून धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होऊन धान्य निर्यातदार देश बनला. शरद पवार यांनी महिलांना आरक्षण दिले,वडिलांच्या संपत्तीत वाटा दिला पोलीस खात्यात, संरक्षण खात्यात भरती होण्यासाठी संधी आणि आरक्षण दिले. महिला आयोगाची स्थापना करून महिलांना न्याय मिळवून दिला. गरिबांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचा विस्तार केला वेगवेगळ्या शिक्षण संस्थाना वेळोवेळी सहकार्य केले.
अनेक मोठमोठ्या उद्योगांना सुविधा उपलब्ध करून देऊन महाराष्ट्रात आणले त्यातून अनेक औद्योगिक वसाहतींची निर्मिती झाली. हिंजवडी सारख्या गावाच्या माळरानावर सॉफ्टवेअर पार्कची उभारणी केली. सहकाराला चालना दिली त्यातून अनेक सहकारी संस्थाची पायाभरणी झाली. त्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. सहकार, संरक्षण,कृषी, शिक्षण, औद्योगिक,सामाजिक, क्षेत्रात अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन राज्य व देशाला नावलौकिक मिळवून दिला. त्यांचाच वारसा सुप्रिया सुळे या समर्थपणे चालवत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सुप्रिया सुळे या अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यातून बारामती लोकसभा मतदारसंघाचा चौफेर विकास होत आहे. सुप्रिया सुळे या या सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात संसदेत आवाज उठवत आहेत. मतदारसंघातील स्थानिक व व इतर महत्त्वाचे प्रश्न संसदेत मांडत आहेत म्हणूनच सुप्रिया सुळे यांना नऊ वेळा महा संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. विरोधकांचे धाबे दणाणले आहे त्यामुळे आज रोजी काही लोक सुप्रियाताई सुळे यांच्या बाबतीत दिशाभुल,अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आपण सर्व मतदार सुज्ञ आहात आपण सर्व जाणून आहात म्हणून कोणत्याही अपप्रचाराला, भूलथापांना बळी न पडता शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणुस या चिन्हासमोरील बटण दाबुन सुप्रिया ताई सुळे यांना चौथ्यांदा आपल्या सेवेची संधी द्यावी असे मतदारांना आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक सचिन दोडके, लक्ष्मीताई दुधाने, किशोर कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.
















