पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) सुरक्षा किट मुळे कामगारांना अपघातापासून बचाव होईल. वाटप करण्यात आलेले सुरक्षा किट हे कामगारांच्या जीवनाला संरक्षण देणारे कवच आहे. जास्तीत जास्त पात्र कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढील महिन्यात 1 हजार सुरक्षा किट वाटप करण्यात येणार असून कामगारांच्या हितासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी आहे. विरोधनकावर टीका करतांना ते म्हणाले की, आम्ही वेळेपूरते राजकारण करीत नाही. पाऊस आला तरच छत्री उघडायची हा धंदा आमचा नसून बाळासाहेबांच्या शिकवणी नुसार सतत समजसेवा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. जिथं दुःख, समस्या तिथं जीपीएस परिवार उभ असंत. जी.पी.एस मार्फत गावातील अनाथांना दररोज भोजनाची व्यवस्था करण्याचा उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज केले. ते शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत मजुरांना साहित्य वाटप प्रसंगी केले. यावेळी जी.पी.एस. मित्र परिवाराचे वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरक्षा किट वाटप हा कार्यक्रम म्हणजे राजकिय हेतूने प्रेरित नसून जनतेशी प्रेमाची बांधिलकी असल्याच्या भावना माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी व्यक्त केल्यात. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन सुरक्षा कीट वाटप सोहळयाचा शुभारंभ करण्यात आला. शासन बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य योजना, सामाजिक सुरक्षा व अर्थिक सहाय्य योजना अंतर्गत 28 प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबवित असून या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येऊन शेवटच्या कामगारांपर्यंत लाभ दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या १६० बांधकाम कामगारांना सुरक्षा संचचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य आणि जी.पी.एस. मित्र परिवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कामगारांनी समाधान व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती !
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पाळधी सरपंच विजय पाटील, महिला जिल्हा संपर्क प्रमुख सरिताताई कोल्हे-माळी, तालुका प्रमुख डि.ओ. पाटील, गजानन पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख विलास महाजन , माजी सभापती मुकुंराव नन्नवरे, जनाआप्पा कोळी , सचिन पाटील, अनिल पाटील, उपजिल्हा प्रमुख नाना सोनवणे, संजय महाजन, आदिसह पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जी.पी.एस. मित्र परिवाराचे सदस्य प्रशांत झवर यांनी केले तर आभार अनिल माळी यांनी मानले.