मुंबई (वृत्तसंस्था) राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात महत्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकेद्वारे आदेश दिला होता. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवता येणार नाही. असंही सर्वोच्च न्यायालयात आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, मुंबईसह १३ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
१. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम परिशिष्ट अ मध्ये नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात यावा.
२. राज्य निवडणूक आयोगाने दि. २८ डिसेंबर, २०२१ रोजी महानगरपालिकांच्या प्रभाग रखनेवायत सविस्तर आदेश निर्गमित केले आहेत.तसेच दि.२७ जानेवारी, २०२२ च्या आदेशान्वये प्रथम प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करून त्यानंतर आरक्षण निश्चिती करण्यासंदर्भात योग्य ती सुधारणा करण्यात आली आहे.
३. महानगरपालिकांनी आरक्षण सोडत काढण्याबाबत दि. २८ डिसेंबर २०२१ च्या आदेशातील मुद्दा क्र.१५ व १३ नुसार उचित कार्यवाही करावी. त्यामधील तरतुदीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिलांची सोडत शासनाने दि. १५ डिसेंबर, २०२५ रोजी प्रसिध्द केलेल्या नियमानुसार करावयाचे असून सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित प्रभाग निश्चित करण्यासाठी वरील मुद्या मध्ये नमूद केल्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. सदर कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय आरक्षण सोबतच्या परिशिष्ट व नुसार प्रसिध्द करावे.
४. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता आरक्षित प्रभाग निश्चित करण्यासाठी अंतिम प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचा उतरता क्रम विचारात घेणे आवश्यक असून राज्य निवडणूक आयोगाकडून त्यानुसार आरक्षणास मंजुरी देण्यात येत आहे.
५. राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २८ डिसेंबर, २०२१ च्या आदेशातील परिशिष्ट १२ नुसार सोडत काढण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे विहित करण्यात आली आहेत. त्यानुसार सोडत काढण्याकरिता योग्य ती उपाययोजना संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी करावी.
६. वरील सूचनांनुसार प्रभागांमधील आरक्षित जागा निश्चित करून सोडतीचा निकाल विहित नमुन्यांमध्ये राज्य निवडणूक आयोगास तात्काळ पाठविण्यात यावा.
७. सोडतीनंतर सोडतीचा निकाल महानगरपालिकेची वेबसाईट सूचना फलक व वर्तमानपत्र इ.ठिकाणी प्रसिद्ध करावा. त्यावर हरकती व सूचना मागविण्याकरिता किमान दोन वर्तमानपत्रात जाहीर सूचना प्रसिद्ध करावी.
८. सोडत काढून त्याची प्रसिध्दी करणे व विहीत कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून आरक्षण अंतिमरित्या अधिसूचित करण्याचे अधिकार याद्वारे संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्रदान करण्यात येत आहेत. त्यानुसार त्यांनी सोबतच्या परिशिष्ट-क मधील अधिसूचनेच्या नमुन्यात प्रभागनिहाय आरक्षण अंतिमरित्या प्रसिद्ध करावा.