पातोंडा ता. अमळनेर (प्रदिप पवार) दुर्दैवी मृत्यू झालेल्या माकडावर अंत्यसंस्कार करून तालुक्यातील पातोंडा गावकऱ्यांनी भूतदया हीच खरी ईश्वर सेवा याचा प्रत्यय देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. प्राणिमात्रांवर प्रेम करा, असे आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. पातोंडा गावकऱ्यांनी याचा आदर्श उभा केला आहे.
पातोंडा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरात एका माकडाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. माकड नेमकं कशामुळे मेले हे नेमकं कळू शकले नाही, तेव्हा स्थानिक परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांसह, सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी माकडाचा अंत्यविधी काढण्याचे ठरविले. सदर अंत्यविधीसाठी पातोंडा गावात राहणाऱ्या असंख्य ग्रामस्थांनी यावेळी मोठ्या संख्येने हजर राहत भारतीय संस्कृती प्रमाणे विधिवत संस्कार करून पूजा-अर्चा करून सवाद्य मिरवणूक काढून माकडाचा अंत्यसंस्कार केला.













