जळगाव (प्रतिनिधी) द्वारका नगर प्रभाक क्र ८ मधील वासीयांना आतापर्यंत बोरिंगच्या पाण्यावर आपले काम भागवावे लागत आहे, त्यामुळे त्यांना अनेक रोगराईला सामोरे जावे लागते, पण त्यांचा आज संयम सुटला व त्यांना पाण्यासाठी आंदोलन करून थेट महापौरांना साकडे घालावे लागले.
मागील तब्बल १२ ते १५ वर्ष पूर्वी नवीन बसलेल्या द्वारका नगरमध्ये अजूनपर्यंत महानगरपालिकाचे पाणी पोहचलेले नाही, वारंवार नगरसेवकांकडे व महानगरपालिकाकडे परिसरातील नागरिकांनी अर्ज व कागदपत्रे यांचा पाठपुरावा करून देखील आजपर्यंत तेथे महानगरपालिकाचे पाणी पोहचलेले नाही. दर पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना फक्त आश्वासन देण्यात आली परंतु, त्यानंतर त्यांच्याकडे कुणी फिरकुनही बघितले नाही. द्वारका नगरमधील वासीयांना आतापर्यंत बोरिंगच्या पाण्यावर आपले काम भागवावे लागत आहे, त्यामुळे त्यांना अनेक रोगराईला सामोरे जावे लागते, पण त्यांचा आज संयम सुटला व त्यांना पाण्यासाठी आंदोलन करून थेट महापौरांना साकडे घालावे लागले.
द्वारकानगर मधील महिलांनी कुंदन सूर्यवंशी व श्रीराम नगर तरुण मित्र मंडळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत चक्क पाण्याचे खाली हंडे डोक्यावर घेत आंदोलन केले व जोपर्यंत महानगरपालिकाचे पाणी त्यांना मिळत नाही तोपर्यंत वेळोवेळी आंदोलन सुरू ठेऊ असा इशाराही दिला. कुंदन सूर्यवंशी यांनी याअगोदर देखील परिसरातील नागरिकांना एकत्र घेत दादावाडीतील खड्ड्यांना आमदार खाजदारांची नावे देत सेल्फी पॉईंट सुरु करुन आंदोलन केले होते, त्यानंतर आंदोलनाची दखल घेत महानगरपालिकाने ते खड्डे भरून काढली होती.
















