मुंबई (वृत्तसंस्था) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना आता अमृता फडणवीस यांनी खरमरीत शैलीत उत्तर दिलं आहे. सचिन गुप्ता आणि जयदीप राणा यांना आऊटसोअर्स करण्यात आलं, हे दिग्दर्शक आणि अशिस्टंट होते. या दोघांनी याआधी सदगुरु यांच्यासाठी गाणं तयार केलं होतं. त्या गाण्यासाठी कोणीही पैसा घेतलेला नाही. मनात आलं असतं तर शाहरुख, सलमानलाही घेतलं असतं, असं रोखठोक उत्तर त्यांनी दिले.
“माझा संपर्क रॅली फॉर रिव्हर्स ही मोहीम राबवणारे सदगुरु यांच्याशी झाला. सदगुरु यांच्या मोठ्या कार्यक्रमात मी सहभागी झाले होते. तेथे मी एक वक्ता होते. त्यानंतर सदगुरु यांच्यासोबत सचिन गुप्ता आणि जयदीप राणा यांना आऊटसोअर्स करण्यात आलं. हे दिग्दर्शक आणि अशिष्टंट होते. या दोघांनी सदगुरु यांच्यासाठी गाणं तयार केलं. या गाण्यावर सर्व बॉलिवूडने गाणं म्हटलं. हे गाणं रिव्हर्र मार्चवाल्यांना आवडलं. याच दोघांना नंतर रिव्हर मार्चने आऊटसोअर्स केलं. सचिन गुप्ता यांनी दिग्दर्शन केलं तर रॅली फॉर रिव्हर मार्चवाल्यांनी सर्व रेकॉर्डिंग फ्रीमध्ये ठेवलं. कोणीही या गाण्यासाठी पैसा घेतला नाही. या गाण्यात शाहरुख, सलमान यांना आणलं असतं पण यामध्ये कोळी बांधव, डेबवाले आहेत. मला तसेच रिव्हर मार्चच्या लोकांमध्ये राजकीय महत्वाकांक्षा नाही, असे स्पष्टीकरण अमृता फडणवीस यांनी दिले.
तसेच पुढे बोलताना अमृता फडणवीस यांनी मलिक यांनी फोटो ट्विट करुन केलेले आरोप निराधार असल्याचे सांगितले. “आम्ही जागृती केली आणि आज आम्हालाच लाथ मारली जाते. आम्हाला कोणतीही राजकीय अभिलाषा नाही. त्यांच्या मागे हात धुवून लागलात हे कोणतं राजकारण आहे. तुम्हाला राजकारण करायचं आहे. बिगडे नवाब व्हायचं आहे ? तुम्ही बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा. तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो,” असा सल्ला अमृता फडणवीस यांनी मलिक यांना त्यांचे नाव न घेता दिला.