मुंबई (वृत्तसंस्था) ओमाक्रॉनची जगभरातील दहशत (worldwide panic) आणि वेगाने पसरत असलेल्या या कोविड-१९ प्रकारामुळे सध्या लोकांच्या मनात या आजाराबाबत भीतीचे वातावरण आहे. दरम्यान हा नवा ओमायक्रॉन विषाणूची नेमकी लक्षणे (Omicron Variant Symptoms) काय आहेत? हे जाणने महत्वाचे आहे. वेळीच त्याची लक्षणे जाणून घ्या आणि काळजी घेण्यास सुरूवात करा.
ओमायक्रॉनची २ लक्षणे सामान्य सर्दीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. त्यांची ओळख करून घेतल्यास या नवीन प्रकाराचा संसर्गावर वेळीच उपाययोजना करता येऊ शकते. असं आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.
काय आहेत ओमायक्रॉनची २ असामान्य लक्षणे?
तज्ज्ञांच्या मतानुसार, त्याची लक्षणे कोरोनाच्या मूळ स्ट्रेनपेक्षा वेगळी आहेत. तर, वेगवेगळ्या प्रकारांमध्ये भिन्न लक्षणे असणे सामान्य आहे. ओमायक्रॉनच्या बाबतीतही असेच आहे. ओमायक्रॉनची लक्षणे सर्दीच्या लक्षणांसारखीच असतात, परंतु डोकेदुखी आणि थकवा या २ वेगळ्या लक्षणांनी हळूहळू सुरुवात होते. असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ओमिक्रॉनची अन्य सामान्य लक्षणे कोणती?
नवीन प्रकार मागीलपेक्षा तिप्पट संसर्गजन्य आहे आणि अधिकाधिक नागरीकांना संक्रमित करू शकतो. हा विषाणू लस आणि नैसर्गिक संसर्गापासूनही प्रतिकारशक्ती टाळू शकतो. आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ओमायक्रॉनची लक्षणे डेल्टासारखी गंभीर नाहीत. ओमिक्रॉनच्या काही सामान्य लक्षणांमध्ये सौम्य तापाचा समावेश होतो, जो आपोआप निघून जातो. याशिवाय थकवा, घसा खवखवणे आणि तीव्र अंगदुखी ही ओमायक्रॉनची लक्षणे आहेत. खरंतर, ओमायक्रॉनमध्ये चव आणि सुगंध कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येत नाहीत. असं WHO चं म्हणनं आहे.
















