जळगाव (प्रतिनिधी) येथे आज ओबीसी परिषद परिषद पार पडली. या परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजपावर हल्ला केला. यावेळी भुजबळ यांनी एक जुना किस्सा सांगितला आहे. आपण ज्यावेळी तुरूंगात होतो त्यावेळी कपिल पाटील यांच्यामुळे माझा जीव वाचला असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.
छगन भुजबळ यांनी तुरुंगात असताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपला जीव कसा वाचवला, याविषयी ते बोलले. “कपिल पाटील यांनी माझा जीव वाचवला. जेलमध्ये जेव्हा मला टाकलं तेव्हा एकदा फार गंभीर प्रकृती झाली होती. तिथे सोपी गोष्ट असते. कुणातरी जेलमध्ये टाकायचं. तो आजारी पडला की त्याच्याकडे बघायचं नाही आणि एक दिवस गेल्यावर म्हणायचं की हार्ट अटॅकने गेला. संपला विषय. पण जेव्हा कळलं की भुजबळ एकदम सीरियस आहेत, तेव्हा हे कपिल पाटील विधानमंडळात उभे राहिले. म्हणाले, तुम्ही काय वागणूक देत आहात त्यांना. हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत, नीट काळजी घेत नाहीत. तिथे मारून टाकणार की काय तुम्ही ? नंतर शरद पवारांनी पत्रच पाठवलं, की भुजबळांना काही झालं, तर हे सरकार जबाबदार राहील. सुदैवाने मी बाहेर आलो”, असं भुजबळ म्हणाले.
जे घाबरले असतील त्यांनी भाजपामध्ये जायचं – भुजबळ
जे घाबरले असतील, त्यांनी ताबडतोब भाजपामध्ये जायचं. मग तुम्हाला सगळं माफ. खरं तेच सांगतोय”, असं भुजबळ म्हणाले. आपल्या बोलण्यामुळे जे घाबरले असतील, त्यांनी भाजपात जावं, असा सल्ला त्यांनी दिला. “हे सगळं असं होत असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आपण जेव्हा एखादी भूमिका मांडतो, तेव्हा सावध राहावे लागतं.
















