जळगाव (प्रतिनिधी) शहरातील लक्ष्मी नगर परिसरात सेवानिवृत्त वृद्धाचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. ही घटना मंगळवार दि. ११ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातून फ्रिज, टीव्ही, कुलर, गॅस हंडी, पातेले यासह एकूण ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील लक्ष्मी नगर परिसरात राहणारे राजेंद्र जगन्नाथ दुसाने (वय ६२) हे सेवानिवृत्त वृद्ध वास्तव्यस आहेत. दि. ११ नोव्हेंबर रोजी त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी फ्रिज, टीव्ही, कुलर, गॅस हंडी, पातेले आणि इतर घरगुती साहित्य चोरून नेले. ही चोरीची घटना मंगळवारी रात्री ही घटना घडली, या घटनेनंतर राजेंद्र दुसाने हे घरी आल्यानंतर बुधवार दि. १२ नोव्हेंबर रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गिरीश पाटील हे करत आहेत
















