जळगाव (प्रतिनिधी) मोलमजुरी करणाऱ्या तरुणाची मोटारसायकल मध्यरात्री घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार तालुक्यात कुसुंबा येथे घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, मनोज संतोष पवार (वय-२५) रा. तुळजाई नगर कुसुंबा ता. जि. जळगाव हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दैनंदिनी कामासाठी (एमएच १९ बीझेड ६७३४) क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे ७ फेब्रुवारी रात्री ८ वाजता दुचाकीवरून घरी आले. दुचाकी घराच्यासमोर लावली व जेवण करून झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरासमोर लावलेली पॅशन प्रो दुचाकी चोरून नेली. १ मार्च रोजी रात्री उशीरा मनोज पवार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.