फत्तेपूर, ता.( जामनेर ) प्रतिनिधी : जवळच असलेल्या लोणी शिवारात गत २ आठवड्यांपासून चोरट्यांनी उच्छांद मांडला आहे. पुन्हा एकदा लोणी येथील १८ शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी झाली असून चोरीच्या घटना थांबत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
लोणी येथील बाळू रंगनाथ ठुबे, बाबुराव सोनू पाटील, दिलीप केशव बोरसे, काशिनाथ एकनाथ सटाले, शंकर एकनाथ सटाले, रघुनाथ पारुबा कालभिले, प्रमोद बळीराम दांडगे, प्रल्हाद उखा कोल्हे, अनंत काशिनाथ वाणी, संतोष श्रीराम पाटील, शोभाबाई अशोक बोरसे, भावलाल शिवलाल चिकटे, शुभम अनिल बलांडे, रामेश्वर भागवत चिकटे, अशोक बाबुराव बोरसे, मनिष अशोक डाकोडे, गोपाल प्रल्हाद कोल्हे, गयाबाई रघुनाथ कालभिले अशा १८ शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतून काल रात्री विद्युत केबल चोरी झाल्याने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान, १४ जानेवारीला रात्री पुन्हा १८ शेतकऱ्यांचे शेती साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याने चोरटे किती मुजोर झाले आहेत, अशी चर्चा केली जात आहे.
याबाबत फत्तेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून चोरट्यांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
















