मुंबई (वृत्तसंस्था) सेकंड हॅण्ड ज्वेलरी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोने दागिने खरेदी आणि विक्रीवर लावण्यात आलेल्या जीएसटीसंदर्भात (AAR)बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा जे ग्राहक सेकंड हॅण्ड ज्वेलरी खरेदी करणार आहेत त्यांना होईल. त्यांना कमी टॅक्स भरावा लागेल. या निर्णयामुळे सेकंड हँड ज्वेलरीच्या पुनर्विक्रेत्यावरील जीएसटीत लक्षणीय घट होईल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कर्नाटक Authority for Advance Ruling (AAR)च्या या निर्णयाच्या अनुषंगाने केवळ सेकेंड हॅण्ड सोने दागिने विक्रीवर जो लाभ मिळेल त्याच्यावर जीएसटी द्यावा लागणार आहे. Aadhya Gold Private Ltd या बंगळुरूच्या कंपनीने एएआरमध्ये अर्ज दिला होता. ज्यामध्ये दागदागिने विक्री करताना सोन्याचा दागिन्यांचा फॉर्म किंवा स्वरुप बदलण्यात आले नसल्यास केवळ सेकंड हँड सोन्याच्या दागिने खरेदी-विक्री यामधील किंमतींच्या फरकावरच जीएसटी लागू होईल की नाही यावर स्पष्टीकरण मागविण्यात आले.
एएमआरजी अॅण्ड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणतात की, ज्वेलर्सच्या हातात कर जमा करण्याची गरज टाळण्यासाठी बहुतेक ज्वेलर्स सामान्य माणूस, नोंदणी नसलेल्या व्यापाऱ्यांकडून जुने दागिने खरेदी करतात. कर्नाटक एएआरच्या फक्त खरेदी किंमत आणि विक्री दराच्या फरकावरच जीएसटी लावण्याच्या निर्णयामुळे ग्राहकांवर होणाऱ्या कराचा बोजा कमी होईल आणि त्याचा परिणाम उद्योगावर होईल.