जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मनियार बिरादरी व अंजुमन तालीमुल मुस्लिमीन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. गफ्फार मलिक यांना ग्लोबल युनिव्हर्सिटी चेन्नईने सामाजिक कार्याबद्दल पीएचडी दिल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर पी पी चौधरी यांच्या हस्ते कांताई सभागृहात करण्यात आला.
यावेळी विशेष प्रमुख अतिथी म्हणून जळगाव शहराच्या प्रथम नागरिक सौ. भारती सोनवणे, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, ईकरा सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर करीम सालार, फौजदारी ज्येष्ठ वकील अकिल इस्माईल, मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व अँग्लो उर्दू ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बाबू देशमुख यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम इमरान खान यांनी कुराण पठण केले व त्याचे भाषांतर मराठी मध्ये हुमायून खान यांनी सादर केले. प्राध्यापिका सौ. शगुफ्ता अकिल, फारुक शेख, सय्यद चांद, आमीन बादलीवाला, शेख शफी, अजिज शेख, मोहिनुद्दीन उस्मानी, ताहेर शेख, यांनी केले
सत्कार मूर्ती डॉ. मलिक यांचा परिचय
नूतन मराठा कॉलेज चे प्राध्यापक आफक अंजुम यांनी डॉक्टर गफ्फार मलिक यांचा परिचय व त्यांच्या जीवनातील मुख्य घटनांचा उलगडा आपल्या भाषणात करून त्यांचा परिचय सादर केला.
मान्यवरांचे मार्गदर्शन
एडवोकेट अकील इस्माईल यांनी डॉक्टर गफ्फार मलिक यांच्या वैयक्तिक जीवनातील प्रसंग अधोरेखित केले तर प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी योग्य माणसाची दखल कधीतरी समाज घेतो परंतु हाजी साहेबांची दखल समाजाने घेतली असली तरी एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने त्यांना सन्मानित करून त्यांचा गौरव केला. ही बाब प्रकर्षाने नमूद करण्यासारखी आहे. डॉक्टर अब्दुल करीम सालार यांनी पन्नास वर्षाच्या मैत्रीतून दोघांचे जीवनातील अत्यंत सुरेख व दुःखदायक घटनांचा उलगडा केला तर त्यांना मिळालेल्या पदवीबाबत मनियार बिरादरी व अंजुमन सोसायटीचे अभिनंदन सुद्धा केले. आमदार शिरीष चौधरी यांनी डॉक्टर गफ्फार मलिक हे विधानसभेत माझ्या विरुद्ध निवडणूक लढवून सुद्धा त्यांनी वैयक्तिक संबंध कायम ठेवले व मला लागलीच दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या तेव्हाच मला लक्षात आले की, डॉक्टर गफार मलिक यांचे राजकीय जीवना व्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रातील जीवन अत्यंत महान असे आहे. महापौर भारतीताई सोनवणे यांनी तरुणांना डॉक्टर गफ्फार मलिक यांच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय वैद्यकीय कार्याबाबत आव्हान करून त्यांचे गुण आत्मसात करण्याचे आव्हान केले.
सन्मान पत्राचे वाचन व प्रदान
जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी अध्यक्ष फारुक शेख यांनी बिरादरी तर्फे देण्यात येत असलेल्या या सन्मान पत्रात त्यांच्या पन्नास वर्ष सेवेचा आढावा अलंकारिक भाषेत सादर केलेला होता.
प्रातिनिधिक स्वरूपात नागरी सत्कार
कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील यांच्या हस्ते मन्यार बिरादरीचे सन्मान पत्र अंजुमन संस्थेचे स्मृतिचिन्ह, शाल व बुके देऊन डॉक्टर गफ्फार मलिक यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर उपस्थित आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, व महापौर भारतीताई सोनवणे यांनीसुद्धा वैयक्तिक डॉक्टर गफ्फार मलिक यांचा सत्कार केला.
सत्काराला उत्तर
डॉक्टर गफ्फार मलिक यांनी सत्काराला उत्तर देताना जळगावकरांनी दिलेले प्रेम, राजकारणात मिळालेले ईश्वरलाल ललवाणी, सुरेश दादा जैन व शरद पवार यांचे मार्गदर्शन, सामाजिक कार्यात आई-वडिलांचे आशीर्वाद शैक्षणिक क्षेत्रात मित्र परिवाराचे सहकार्य या बाबीवर मिळालेली ही समाज सेवेची पीएचडी मी या समाजाला अर्पित करतो व हा माझा एकट्याचा नव्हे तर संपूर्ण जळगावकरांचा सन्मान आहे. व त्या सन्मानासाठी मी अहोरात्र झटेल व सामाजिक कार्य माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहील असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषण
कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात उर्दू कवी डॉक्टर बशीर बद्र च्या शेर ने केली व डॉक्टर गफ्फार मलिक यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक वैद्यकीय व क्रीडा क्षेत्रातील कार्याचा कार्याबाबत त्यांना ग्लोबल विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली तो त्यांचा यथोचित सन्मान असून त्यास ते पात्र असल्याने त्यांना ही पदविका मिळाली भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बाबू शेख यांनी तर सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले. आभार अँग्लो उर्दू ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका आसेफा खान यांनी व्यक्त केले.
विविध संस्था व संघटनांतर्फे सत्कार
कार्यक्रमाच्या शेवटी जळगाव शहरातील व जिल्ह्यातील विविध शैक्षणिक क्षेत्रातील संस्था राजकीय क्षेत्रातील पक्षसंघटना सामाजिक क्षेत्रातील संघटना अशा एकूण १०३ संघटनांमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.