TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा !

नाशिक विभागात जळगाव जिल्हा अव्वल ; ३१ जुलै २०२३ अंतिम मुदत !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 31, 2023
in कृषी, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ३३ हजार १४२ शेतकरी सहभागी झाले आहेत. ३१ जुलैपर्यंत या योजनेची अंतिम मुदत असून जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या योजनेत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

अतिवृष्टी, अवकाळ, दुष्काळ या नैसर्गिक संकटाशी मुकाबला करत अन्नदाता शेतकरी अन्नधान्याचे उत्पादन घेतो, आपत्तीच्या काळात शेतकऱ्याच्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. केंद्र, राज्य सरकार आणि शेतकरी यांचा समायीक हिस्सा पीक विमा योजनेसाठी होता. मात्र २०२३ च्या खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देण्याच निर्णय घेतला. येत्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येणार आहे. २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ४२९ कर्जदार आणि ३ लाख २१ हजार ७१३ बिगर कर्जदार अशा एकूण ३ लाख ३३ हजार १४२ शेतकऱ्यांनी ३ लाख ३९ हजार ७६ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचा विमा उतरवला आहे.

READ ALSO

सवलतीच्या रोपांअभावी वृक्षारोपणाला अडथळा; मराठी प्रतिष्ठानकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

कृषीच्या नाशिक विभागांतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. यात नाशिकमध्ये – ३३०५६२, धुळे – १५५७६४, नंदुरबार – ८८११७ व जळगाव – ३३३१४२ शेतकऱ्यांनी पीक योजनेत सहभाग नोंदवला आहे. जळगाव जिल्हा नाशिक विभागात अव्वल क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील एक रूपयात पीक विमा पोटी १३१६.०७ कोटी रूपये रक्कम संरक्षित करण्यात आली आहे.

मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम योजनेत जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५८६ शेतकरी सहभागी झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण १६८.६१ टक्के आहे. या योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल, सध्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा जागर करण्यात आला.

जिल्ह्यातील तीन उपविभागीय कृषी अधिकारी, १५ तालुकास्तरीय कृषी अधिकारी आणि जवळपास २७४ कृषी सहाय्यक यांनी एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवली. त्यातूनच यावर्षी खरीप हंगामात या योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उच्चांकी सहभाग झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सवलतीच्या रोपांअभावी वृक्षारोपणाला अडथळा; मराठी प्रतिष्ठानकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

June 12, 2025
कृषी

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

June 7, 2025
कृषी

गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

June 6, 2025
जळगाव

कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांचा विजेसंदर्भातील संताप

June 4, 2025
कृषी

अवकाळी पावसानंतर उघडीप मिळाल्याने खरीप हंगामाला वेग

June 2, 2025
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव हादरलं ! पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण हत्या

March 19, 2022

झेडपी सदस्यांचा १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने यावर लक्ष द्यावे ; मनसेच्या पोस्टर्सची बीडमध्ये चर्चा

March 1, 2022

कंगना राणौतनंतर आता सोनू सूदविरोधात BMC ची तक्रार; रहिवासी इमारतीमध्ये हॉटेल सुरू केल्याचा आरोप

January 7, 2021

वाळूमाफियांचे दोन गट भिडले ; भुसावळच्या गुन्हेगाराकडून गोळीबार !

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group