जळगाव (प्रतिनिधी) शहरात भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवित दोघा चोरट्यांनी १५ लाख रुपयांची बॅग हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी काल दोघांसह त्यांना आश्रय देणाऱ्या एकाला अशा तिघांना उल्हासनगरातून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ९ लाख ५० हजार रूपये जप्त करण्यात आले आहे.
मनोज खुशाल मोकळ, विक्की उर्फ रितीक राणा (दोन्ही रा.धुळे) व दीपक सोनार (रा.उल्हासनगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. एमआयडीसीतील प्रभा पॉलीमर कंपनीचे कर्मचारी महेश चंद्रमोहन भावसार (वय ५३, रा. दिक्षीतवाडी, जळगाव) आणि संजय सुधाकर विभांडीक (वय-५१, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे १ मार्च २०२१ रोजी दुपारी ५ वाजेता आर. कांतीलाल जोशी पेठे मटन मार्केटजवळ येथून ५ वाजेच्या सुमारास १५ लाख रूपयांची रोकड घेऊन गणपती नगरकडे जाण्यासाठी निघाले. यातील महेश भावसार यांच्याकडे रोकड कापडाच्या पिशवीत ठेवून एका दुचाकीवर होते. तर विभांडीक हे त्यांच्या सोबत दुसऱ्या दुचाकीवरून जात होते. हे दोन्ही जण पंचमुखी हनुमान मंदिराजवळच्या पद्मावती मंगल कार्यालयाजवळ आले असतांना अज्ञात दोघांनी विनानंबरच्या दुचाकीने ओव्हरटेक केला. भावसार यांच्या गाडीला पिशवीसह रोकड लांबविला होता. याप्रकरात झालेल्या झटापटीत भावसार यांची दुचाकी घसरल्याने तेही पडले. त्याने दोन्ही चोरट्यांची गाडी देखील स्लिप झाली. यातील एकाने महेश भावसार यांच्याकडून रोकड असणारी बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्याला यश आले नाही. यामुळे चोरट्याने रिव्हॉल्व्हर काढून त्यांना धमकावले. यात झालेल्या झटापटीत रिव्हॉल्व्हरची मॅगेझीन खाली पडली. भावसार यांच्या हातातील १५ लाख रूपयांची बॅग घेवून चोरट्यांनी दुचाकी जागेवर सोडून एकाच दिशेने पळ काढला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुचाकीच्या नंबरवरून संशयित आरोपींची ओळख
घटनास्थळावर सोडून दिलेल्या दुचाकीच्या चोवीस नंबरवरून संशयित आरोपी मनोज खुशाल मोळक व विक्की उर्फ रितीक राणा दोन्ही रा. मोहाडी ता. जि. धुळे या दोघांचे संशयित नावे समोर आले. पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली होती. काल दोघांना एमआयडीसी पोलीसात उल्हासनगरातून येथून अटक केली आहे. दोघांकडून ९ लाख ५० हजार रूपये जप्त करण्यात आले आहे. पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार दोघांनी जळगावातून अमळनेर, धुळे आणि उल्हासनगर असा प्रवास केल्याचे सांगण्यात आले आहे.
एमआयडीसी पोलिसांनी केली अटक
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, सुधीर साळवे व इम्रान सय्यद तर स्थानिक गुन्हे शाखेचे स्वप्नील नाईक, संजय हिवरकर, राजू मेढे, रवी नरवाडे यांचे दोन पथकाला संशयितांनी अमळनेर, सुरत येथून हुलकावणी दिली. यानंतर मागावर असलेल्या पथकाने दोघांना उल्हासनगर येथे त्यांच्या मित्रांच्या घरुनच अटक केली. या गुन्ह्यात ज्या मित्रांच्या घरातून रोकड मिळाली, तसेच संशयितांनी मुक्काम केला. त्या दिपक सोनार यासही गुन्ह्यात आरोपी करण्यात येवून अटक करण्यात आली आहे.















