पाळधी / जळगाव (प्रतिनिधी) : शिवसेना ही फक्त राजकीय संघटना नसून एक विचार आणि कुटुंब आहे. या कुटुंबात जे पाऊल टाकतात, त्यांना विकास आणि सन्मान हमखास मिळतो, आज या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश करून विकासाचा मार्ग स्वीकारला असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज झालेल्या प्रवेश सोहळ्यात केले.
जळगाव तालुक्यातील रायपूर व परिसरात आज शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली तरुणाईचा ओघ उसळला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच उ.बा.ठा. गटातील अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उप तालुकाप्रमुख प्रवीण परदेशी यांच्या प्रयत्नाने सर्वांनी शिवसेनेत यावेळी प्रवेश केला.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमात रायपूरचे माजी उपसरपंच मनोज परदेशी, माजी सरपंच मधुकर धनगर, तसेच शुभम परदेशी, उज्वल परदेशी, सागर परदेशी, सुनील परदेशी, कृष्णा शिंदे, बापू सकर, पंकज शिंदे, निखिल सावळे, महेश कोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला.
तर उ.बा.ठा. गटातील विशाल सैदाने, विशाल सावळे, पवन धनगर, दिलीप धनगर, शुभम धनगर, राजेश धनगर, धीरज सोळंखे, दिलीप परदेशी, अनिल परदेशी, प्रेमसिंग ठाकूर यांनी देखील भगवा स्वीकारत शिवसेनेच्या संघटनेत प्रवेश केला.
या प्रसंगी जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जळगाव शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, रायपूर उपतालुका प्रमुख प्रवीण परदेशी, युवासेनेचे अतुल घुगे, चांदसरचे माजी सरपंच सचिन पवार, माजी नगरसेवक मनोज चौधरी, हितेंद्र नारखेडे, युवासेनेचे आबा माळी, किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
















