सांगली (वृत्तसंस्था) सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे. उमदेवार पळवापळीवच्या मुद्द्यावरुन आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले. दोन्ही गटात चांगलाच वाद झाला असून पडळकर यांच्या गाडीचीसह काही गाड्यांवर दगडफेक करण्यात आली.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात मोठा वाद झाल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून मंगळवारी अर्ज माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार आहे. मतदार संख्या अवघी अडीच हजार असल्याने मतदार पळवापळवीवरुन आटपाडी येथील साठे चौकात राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांच्या अंगावर मोटार घातल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये जानकर यांचा पाय मोडला असल्याचे सांगण्यात आले. आटपाडी मध्ये तणाव निर्माण झाला आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.