मेष : आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. भावाच्या सल्ल्यामुळे आज व्यापारात प्रगती होईल. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागेल. तुमचे मन नाराज राहील. आज काहींना वादविवादाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. काहीजण धार्मिक कार्यात सहभागी होतील. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता राहील, या कारणामुळे खर्चही होऊ शकतो. मनोबल कमी राहील.
वृषभ : कुटुंबाच्या दैनिक खर्चावर तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागू शकतात, त्यामुळे तुमच्या अडचणी वाढतील. मानसिकता सकारात्मक असणार आहे. आपल्याला बौद्धिक क्षेत्रात सुयश लाभणार आहे. काहींना विविध लाभ होणार आहेत. प्रवासाचा योग संभवतो. आज आईसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आपले मनोबल उत्तम असणार आहे.
मिथुन : आज कुटुंबातील सदस्यांत काही मतभेद होऊ शकतात. तसेच तुम्हाला आज संततीच्या भविष्याची चिंता सतावेल. आजचा दिवस आपणाला अनेकदृष्टीने अनुकूल असणार आहे. कामाचा व्याप असला तरी आज तुम्ही उत्साही असणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जर तुम्ही नवीन कामात गुंतवणुकीची योजना बनवत असाल तर तुम्हाला यश मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
कर्क : आज रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल, त्यासाठी आळस सोडावा लागेल. आज आपणाला नवी दिशा सापडेल. कामाच्या ठिकाणी आपला उत्साह विशेष असणार आहे. चिकाटीने कार्यरत राहून दैनंदिन कामे पूर्ण करू शकणार आहात. आज दिवस तुमच्या जीवनात प्रगतीचा नवा प्रकाश घेऊन येईल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल.
सिंह : विवाहयोग्य व्यक्तींना आज काही चांगले प्रस्ताव येतील. आज गरीब व्यक्तींना काही मदत केली तर तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज आपले मनोबल कमी असल्याने कामामध्ये तुमचे लक्ष लागणार नाही. आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना संभवते. आपण शांत व संयमी राहावे. प्रवासात काळजी घ्यावी. जे लोक परदेशात राहात आहेत, त्यांना शुभवार्ता मिळेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील.
कन्या : आज तुम्हाला मित्रांची मदत करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात आज तुम्हाला तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि अन्यता वादविवाद होऊ शकतात. आपल्याला कामाचा त्रास होणार नाही. तुम्ही अधिक उत्साहाने कार्यरत राहणार आहात. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत आज काही मुद्द्यांवर चर्चा होईल. आपल्या हातून आज एखादे सत्कार्य होणार आहे. आज तुम्हाला मनात नसतानाही काही खर्च करावे लागतील. तुम्ही आनंदी व आशावादी राहणार आहात.
तुळ : आज काम जास्त लागल्याने प्रकृती बिघडू शकते. आज नोकरी करत असला तर तुमच्या अधिकारात वाढ होईल. दैनंदिन कामात आपल्याला अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. काहींना विनाकारण एखादी चिंता त्रास देईल. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाईल. आज व्यापारात कुटुंबीयांची मदत मिळेल, त्यामुळे अडचणी कमी होतील. मनोबल कमी असणार आहे.
वृश्चिक: आज तुम्ही व्यावसायिक प्लॅनिंग कराल आणि याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. व्यापारात काही नवीन बदल कराल. तुमच्या मित्र-मैत्रिणींना तुम्ही भेटणार आहात, प्रिय व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात. आपल्याला महत्त्वाच्या कामात सुयश लाभणार आहे. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल, आणि आज खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.
धनु : प्रेमजीवनात आज नवी ऊर्जा दिसेल, तसेच वैवाहिक जीवनात नाते अधिक मजबूत होईल. आज व्यापारात इतरांवर फार अवलंबून राहू नका. आज तुम्ही विशेष आनंदी व आशावादी राहणार आहात. तुम्ही नोकरी, व्यवसायातील कामे पूर्ण करू शकणार आहात. आज तुमच्यासाठी पदोन्नतीचा दिवस आहे, आणि तुम्हाला अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. काहींना विविध लाभ होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे.
मकर : आज व्यापारात इतरांवर फार अवलंबून राहू नका, असे केले तर तुमचे रखडलेले पैसे हाती येतील. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल आणि स्पर्धापरीक्षांचा मार्ग प्रशस्त होईल. प्रवासास आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. आपल्या महत्त्वाच्या कामात आपल्याला आज सुयश लाभणार आहे. आज तुमच्यासाठी पदोन्नतीचा दिवस आहे, आणि तुम्हाला अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही विशेष जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात.
कुंभ : कामकाजात अधिक व्यस्त राहाल, तरीही जोडीदारासाठी आज वेळ काढू शकाल, त्यामुळे जोडीदार खुश राहील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे. आज आपणाला मिष्टान्नाचा लाभ होईल. आर्थिक कामांसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. दीर्घकाळापासून थांबलेली कामे आज पूर्ण होताना दिसतील आणि धार्मिक कार्यात तुमचा सहभाग राहील. आज काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल.
मीन : व्यापारात तुम्हाला प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागू शकतो, पण तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुमचा उत्साह वाढेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. आज तुम्ही आपली मते स्पष्टपणे मांडू शकणार आहात. आजचा दिवस तुमच्या भविष्यातील नवीन योजनांसाठी फार लाभदायक आहे. तुम्हाला उत्साहवर्धक घटना अनुभवण्यास मिळेल.














