मेष : मुलांच्या भविष्याशी संबंधित कोणताही निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत मतभेद होतील. व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.नात्यात सावध राहा. फालतू खर्च करणे टाळा. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. लांबचा प्रवास टाळा अन्यथा प्रवास करताना तुम्हाला दुखापत होऊ शकते. तुमच्यावर जबाबदारी येऊ शकते.
वृषभ : व्यवसायात नवीन काही करण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्या. मातृपक्षाकडून तुम्हाला आर्थिक लाभ होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कोर्टात सुरु असलेल्या वादातून दिलासा मिळेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कुटुंबात विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही तुमच्या रागावर आणि कठोर शब्दांवर नियंत्रण ठेवावे. अन्यथा हा वाद गंभीर स्वरूप घेऊ शकतो.
मिथुन : कला, अभिनय, शिक्षक, अभ्यास, अध्यापन इत्यादी कार्यात गुंतलेल्या लोकांना विशेष सन्मान आणि यश मिळेल. परीक्षा स्पर्धेत यश मिळेल. वैयक्तिक नातेसंबंधात मतभेदांना सामोरे जावे लागेल. जीवनातील कठीण अनुभवांमधून धडा घ्याल. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. निरुत्साही राहाल. आज व्यवसायात अपेक्षा पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. महत्त्वाची कामे आज नकोत. कौटुंबिक जीवनात मनस्ताप संभवतो. कार्यक्षेत्रात तुमच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक होईल. व्यवसायात कठोर परिश्रम करूनही तुम्हाला लक्षणीय यश मिळेल.
कर्क : शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करावा. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. राजकारणात काम करणाऱ्यांना मान-सन्मान मिळेल. सासरच्यांकडून आदर मिळेल. कला व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला जाणार आहे. कामात मतभेद वाढू शकतात. एखादी अप्रिय बातमी मिळू शकते. व्यवसायात येणाऱ्या लोकांची स्थिती सुधारेल.
सिंह : व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा होईल. मोकळेपणाने खरेदी केल्याने मनात शांतीची भावना राहिल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. कौटुंबिक संबंध चांगल्या पद्धतीने सांभाळाल. तुम्ही आज आनंदी व आशावादी राहाल. दिवस तुमच्यासाठी लाभाचा आणि प्रगतीचा दिवस असेल. हळूहळू कामे होतील. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या बुद्धीच्या आधारे निर्णय घ्या.
कन्या : कामात नव्याने नियोजन कराल. निर्णय घेताना मनाचे ऐका. इतरांच्या चुका सहजपणे माफ कराव्या लागतील. प्रवासाचे योग येतील. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. आजचा दिवस तुमचा व्यवसायात झपाट्याने बदल घडवेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहू शकाल. दिवसाची सुरुवात काही अनावश्यक धावपळीने होईल. काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात लोकांना नोकरी मिळण्यास विनाकारण विलंब होऊ शकतो.
तुळ : नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांच्या मदतीने कामे सोपी होतील. आरोग्याची काळजी घ्या. मनाविरुद्ध घटना घडेल. मानसिक ताणतणाव राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कौटुंबिक जीवनात वादविवाद टाळावेत. आजचा दिवस व्यवस्था आणि प्रकल्प पूर्ण करण्यात जाईल. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. सामाजिक सन्मान व प्रतिष्ठा वाढेल. स्वतःवर विश्वास ठेवा. कोणाचीही दिशाभूल करू नका इ. कामाच्या ठिकाणी चढ-उतार होतील.
वृश्चिक : आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींमध्ये अधिक उत्साही राहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. आज तुमचा मूड चांगला असेल. मुलांचे आरोग्य बिघडू शकते. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत बढतीची चांगली बातमी मिळेल. वडिलांच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या मदतीने कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. व्यावसायिक क्षेत्रात संयमाने काम करा.
धनु: यशाची पायरी चढण्यासाठी जुन्या मित्राची मदत होईल. आर्थिक स्थिती चांगली असेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. अनावश्यक कामे करावी लागणार आहेत. तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. मनस्ताप संभवतो. आज नकारात्मक विचारांना दूर करावे लागेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना त्यांच्या व्यवसायात नफा आणि प्रगतीची संधी मिळेल. उदरनिर्वाह क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नोकरीत जास्त मेहनत घ्यावी लागेल.
मकरः नातेसंबंधात भावनांवर वर्चस्व राहिल. नोकरीत अधिकाऱ्यांच्या मदतीने चांगली बातमी मिळेल. मुला-मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. कामाच्या ठिकाणी जुन्या पद्धती वापरल्याने फायदा होईल. कोणाशीही बोलताना विचारपूर्वक बोल. बौद्धिक क्षेत्रात क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. नोकरीत प्रमोशनसोबतच तुम्हाला हव्या त्या ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते. कार्यक्षेत्राच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला जाईल. उदरनिर्वाहात प्रगती आणि लाभाची शक्यता राहील.
कुंभ : मिळालेली सुवर्णसंधी गमावू नका. नोकरीत बढतीची शक्यता आहे. शत्रू अडथळे निर्माण करतील. नोकरी, व्यवसायात स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आज भूतकाळ आणि भविष्यातील योजनांमध्ये अडकू नका. प्रॉपर्टी, गुंतवणुकीस अनुकूलता लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. काही वैयक्तिक समस्या सोडवल्याने मनातील आनंद वाढेल. महत्त्वाच्या कामासाठी केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळेल. प्रतिष्ठित लोकांशी संपर्क साधला जाईल.
मीन: कुटुंबात सुरु असलेले वाद आज संपतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. ज्यामुळे संबंध बिघडू शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. काहींना नवा मार्ग दिसेल. सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. बिझनेसनिमित्त ट्रिपला जाल. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास दिवस अनुकूल आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात विनाकारण मतभेद होऊ शकतात. राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीला कठोर शब्द बोलू नका. अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो.