मेष : तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या मनात आनंद राहिल. प्रियजनांसोबत वेळ घालवाल. तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल.आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. आज तुम्हाला मुलांकडून निराशाजनक बातम्या मिळतील. भागीदारीत सुयश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. कामे मार्गी लावू शकणार आहात. आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल.
वृषभ : सरकारी क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर त्यातून सुटका होईल. अनावश्यक कामात वेळ वाया जाणार आहे. एखाद्या बाबतीत तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागेल, त्यामुळे काळजी घ्या. नवीन करारामुळे तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाची कामे आज नकोत. काहींची धार्मिक प्रगती होईल. आज वैचारिक पातळीवर आपल्या गोड वाणीमुळं इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल.
मिथुन : शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन लोक भेटतील. पालकांची सेवा करण्यात वेळ घालवाल. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. विविध लाभ होतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मुलांच्या शिक्षणात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरणार आहेत. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आईविषयी अधिक भावनाशील व्हाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत.
कर्क : तुमची प्रतिष्ठा वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागेल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. सार्वजनिक कार्यात प्रभाव राहील. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास अनुकूलता लाभेल.तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सरकारी नोकरीत बढती मिळेल. आपली मते इतरांना पटवून द्याल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र आणि नातलग भेटतील. प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल.
सिंह : मुलांच्या शिक्षणासाठी धावपळ करावी लागेल. तुम्हाला कामाचा थकवा जाणवेल. डोळ्यांची जळजळ होऊ शकते. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामांत सुयश लाभेल. शत्रू तुमची प्रगती पाहून चिंताग्रस्त होतील. बोलण्यात नम्रपणा ठेवा. प्रवास सुखकर होणार आहेत. नातेवाइकांच्या गाठीभेटी घेऊ शकाल. आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिकदृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्या लोकांचे निरोप येतील आणि व्यवहारातून लाभ होतील.
कन्या : आज तुमच्या व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक व्यवहारास दिवस अनुकूल आहे. व्यवसायासाठी वडिलांच्या सल्ल्याची आवश्यता लागेल. व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळं आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिकदृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे.
तुळ : व्यवसायातील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मोठ्या व्यवहारांची समस्या दूर होईल. लांबचा प्रवास पुढे ढकलाल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. ज्यामुळे तुमची प्रगती होईल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल. आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल.
वृश्चिक : मित्रांची संख्या वाढेल. तुमचे शत्रू निर्माण होतील. तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. शारीरिक समस्या येत असतील तर त्रास वाढेल. मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. आज सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात सहभाग घ्याल. एखाद्या बाबतीमध्ये तुमची चिडचिड होणार आहे. मनाविरुद्ध घटना घडेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी-व्यवसायात फायदा होईल, मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासह निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील.
धनु : उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ ठेवा, अन्यथा आर्थिक स्थिती बिघडेल. व्यवसायात नफा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. आज कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल.
मकर : कोणाशीही वाद घालू नका. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. तुमचे पैसे खर्च होतील. कुटुंबातील सदस्य व्यस्त असतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात तुम्ही प्रयत्न करत असाल तर संधी मिळेल. वरिष्ठांबरोबर सुसंवाद राहील. गुंतवणुकीची व प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल.
कुंभ : तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. प्रतिकूल बातम्या ऐकून अचानक प्रवासाला जावे लागेल. कोणाशीही वाद घालू नका. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. अस्वस्थता संपेल. बुद्धीने केलेली कृती तुमचे नुकसान करु शकते. व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. प्रवासाचे योग येतील. जिद्द वाढणार आहे. आज अनेक विध विचारांमुळं मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल.
मीन : धार्मिक ठिकाणी प्रवास पैसे खर्च होतील. नातेवाईकांशी सामना करावा लागेल. विचारपूर्वक बोला, नात्यात दूरावा येईल. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मात्र, दैनंदिन कामे रखडणार आहेत. मौल्यवान वस्तू चोरीला जाईल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. वादविवादात सहभाग टाळावा. प्रवासात एखादा मनस्ताप संभवतो. वाहने सावकाश चालवावीत. आज व्यापार्यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी अनुकूल दिवस आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील.