मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. आशावादीपणे कार्यरत राहाल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होईल.
वृषभ : आपले मनोबल उत्तम राहणार आहे. आपली मानसिकता सकारात्मक असणार आहे. आज आपले व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. आपले बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक लाभ होतील.
मिथुन : आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. कौटुंबिक जीवनात तुम्हाला आनंद लाभेल. प्रवास सुखकर होतील.
कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभणार आहे. काहींना नवी दिशा सापडेल.
सिंह : मनोबल कमी असणार आहे. आज आपण आपली दैनंदिन कामे लक्षपूर्वक करावीत. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने जपून चालवावीत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.
कन्या : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस आपल्याला अनेक बाबतीत अनुकूल आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील.
तुळ : तुमच्या मनोबलाच्या जोरावर आज तुम्ही आपली सर्व कामे मार्गी लावणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव राहील. दैनंदिन कामे यशस्वी होतील.
वृश्चिक : मनोबल उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या प्रियजनांसाठी वेळ देता येणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.
धनु : आज आपण कोणतेही धाडस करण्याचे टाळावे. बेकायदेशीर गोष्टीपासून दूर राहावे. कोणत्याही गोष्टीची अकारण चिंता करण्याचे टाळावे. वादविवादात सहभाग नको. वाहने जपून चालवावीत.
मकर : तुम्हाला अनपेक्षित प्रवास करावा लागेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुम्हाला नवा मार्ग दिसेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत मनोबल कमी राहील. आज महत्त्वाची कामे करण्याचे शक्यतो टाळावे. एखाद्या बाबतीत आज आपल्याला अकारण मनस्ताप संभवतो. प्रवास नकोत.
मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आज आपले विचार सकारात्मक असणार आहेत. तुम्ही तुमचे म्हणणे इतरांना पटवून देऊ शकणार आहात.