मेष : आज तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्यासाठी अर्धवेळ काम करण्याचा विचार करू शकता. घरात धर्म-कार्य आणि अध्यात्माचे वातावरण राहील. मित्र आणि नातेवाईकांशी संवाद होऊ शकतो. आज कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. दिवस फारसा अनुकूल नाही. अधिक मेहनतीची गरज भासेल. कामाचे योग्य नियोजन करा.
वृषभ : कुटुंबात कोणत्याही शुभ कार्यक्रमाची तयारी चालू शकते. विवाहयोग्य लोकांच्या विवाहात येणारा अडथळा आज संपेल. व्यावसायिकांसाठी आज परिस्थिती समाधानकारक असेल, तुम्ही तुमच्या कामाच्या व्यवसायात जास्त वेळ देऊ शकणार नाही, परंतु तुम्ही तुमचा खर्च कमी वेळात भागवू शकाल. वायफळ गोष्टींपासून दूर रहा. फक्त आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करावे. मैत्रीत सलोखा ठेवावा. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. सकारात्मक विचार करावेत.
मिथुन : व्यस्ततेमुळे तुम्हाला अनेक कामे पुढे ढकलावी लागतील. दुपारनंतर तुमच्या व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होईल. जोडीदारासोबत प्रेम आणि समन्वय राहील, भेटवस्तू देऊन जोडीदाराला खुश करू शकता. आज तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काही चिंता असू शकते. नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. काम वेळेवर पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. अति घाई करून चालणार नाही. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा लागेल. अचानक आलेल्या समस्येतून मार्ग निघेल.
कर्क : आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे घरच्या बाबतीत पूर्ण सहकार्य मिळेल, आर्थिक दृष्ट्या देखील तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल आणि तुम्हाला सामाजिक कार्यात पैसे खर्च करावे लागतील. विचारांना योग्य दिशा द्यावी. कोणत्याही गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाहीत. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात विस्तार होईल, तुमच्या मेहनतीने यश मिळेल. समाजात मान-सन्मानही मिळेल. भावांचे सहकार्य लाभेल त्यामुळे काही कौटुंबिक प्रश्न सुटतील. आज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचे सहकार्य आणि आशीर्वाद मिळेल. कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. अधिकारी वर्गाचे सहाय्य लाभेल. मैत्रीचे नवीन संबंध प्रस्थापित होतील. इतरांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला चांगल्या बातमीची प्रतीक्षा राहील.
कन्या : नशीब तुमची साथ देईल आणि तुमची प्रगती होईल, तुमच्या विरोधकांची ईर्षा वाढेल, परंतु तुम्ही तुमच्या कामावर संयमाने लक्ष द्या. जर व्यवसायाशी संबंधित कोणतीही समस्या चालू असेल तर आज ती सुधारणे देखील शक्य आहे. आर्थिक लाभाबाबत सतर्क राहावे. मानभंगाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराचा तुमच्यावर वचक राहील. डोक्यात काहीसा गोंधळ चालू राहील. सरकारी कामे अडकून पडू शकतात.
तूळ : कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेले बदल सकारात्मक परिणाम आणतील. विद्यार्थ्यांना आज उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात यश मिळेल. जर तुम्ही शिक्षणासाठी बाहेर कुठे जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही यातही यशस्वी व्हाल. भाऊ आणि मित्रांच्या सहकार्याने घरातील आवश्यक कामे पूर्ण होतील. महत्त्वपूर्ण लोकांशी ताळमेळ जुळून येईल. आर्थिक स्थितीचा विचार कराल. नवीन जबाबदारी सामोरी येईल. चांगल्या गुंतवणुकीला वाव आहे. दिवसभर कामात व्यग्र राहाल.
वृश्चिक : रखडलेले पैसे मिळू शकतात, यामुळे तुमच्या व्यावसायिक क्षेत्रातही प्रगती होईल. वैवाहिक जीवनात एखाद्या गोष्टीबाबत तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराचे ऐका आणि ते रागावले असतील तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. काही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. मुलांची काळजी लागून राहील. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. पारमार्थिक कामात सहकार्य कराल.
धनू : तुमच्या बोलण्यातून आणि व्यवसायातील कार्यकुशलतेतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. लेखा हिशेबनिसाचे काम, बँकिंग आणि विमा क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या क्षेत्रात शुभ आणि अनुकूल परिस्थितीचा लाभ मिळेल. कौटुंबिक जीवनात जोडीदारासोबत प्रेम आणि सुसंवाद राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. नवीन लोकांसोबत चर्चा कराल. भावनांवर संयम ठेवावा. घरातील वातावरण शांततामय ठेवावे. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा.
मकर : आज मकर राशीच्या लोकांना मुलाच्या भविष्याशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. राशीतून चौथ्या भावात चंद्राचे भ्रमण आज तुमच्या आनंदात वाढ करेल. चांगली बातमी मिळाल्यानेही तुम्ही आनंदी व्हाल. चिकाटी सोडून चालणार नाही. जवळच्या प्रवासात अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. काही गोष्टीत धीर धरावा लागेल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.
कुंभ : क्षेत्रातील तुमच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा फायदा तुम्हाला मिळेल. जे लोक नोकरी बदलण्याच्या किंवा नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आज त्यांच्या प्रयत्नात यश मिळू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी महागात पडेल. आज तुम्हाला काही घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवा. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. मनातील संकोच काढून टाकावा. बोलतांना शब्द जपून वापरावेत. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे.
मीन : आर्थिक लाभ मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींकडून तुम्हाला आनंददायी बातम्या मिळू शकतात. आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची आणि जेवण करण्याची संधी मिळेल. अति घाई त्रासदायक ठरू शकेल. आपल्या अपेक्षा संतुलित ठेवा. क्षुल्लक कारणावरून चिडचिड करणे टाळा. जवळचे मित्र मदत करतील. घरगुती कामात अधिक लक्ष घालावे. (Today Rashi Bhavishya, 14 June 2023)