मेष : आईसोबत वैचारिक मतभेद होतील, त्यामुळे सावध राहा. घरी पाहुणे येऊ शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रातील अडचणी काही प्रमाणात कमी होणार आहेत. सासरच्यांसोबत वाद संपतील. वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. आपले मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. व्यवसायानिमित्त काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. जिद्द वाढेल. संशय दूर होतील आणि तुम्हाला इच्छित माहिती मिळेल.
वृषभ : कुटुंबातील सदस्यांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. मानसिक उद्विग्नता राहणार आहे. अकारण चिंता करू नये. मनोबल कमी राहील. कौटुंबिक व्यवसायाच्या विस्ताराबाबत भावांसोबत चर्चा होईल. महत्त्वाची कामे तसेच महत्त्वाच्या गाठीभेटी शक्यतो आज नकोत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वैयक्तिक बाबतीत सतर्क रहा. मिटिंगासाठी वेळ द्या आणि सामान्य फायदे आणि परिणाम राखा.
मिथुन : मालमत्तेशी संबंधित समस्या पुन्हा उभ्या राहातील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्ही उत्साहाने अनेक कामे यशस्वी करणार आहात. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. व्यवसायाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. आत्मविश्वास उच्च राहील आणि इच्छित यश मिळण्याची शक्यता आहे.
कर्क : कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाल. अकारण एखादा मनस्ताप संभवतो. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. आज आपण शांत व संयमी राहावे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना पूर्ण लाभाच्या संधी मिळतील. वादविवादात पडू नये. प्रतिकूलता जाणवणार आहे. आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या ध्येयासाठी सतर्क रहा. नफा वाढेल आणि तुम्ही अनुकूल काळाचा चांगला उपयोग कराल.
सिंह : मित्रांची संख्या वाढेल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. संततीसौख्य लाभणार आहे. आज तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आजची तुमची कामे तुमच्या मनासारखी पार पडणार आहेत. आजूबाजूच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्ही विशेष आनंदी राहाल. आर्थिक लाभ होतील. आज तुम्हाला तुमच्या कार्यात तुमच्या मेहनतीप्रमाणे अधिक यश मिळेल.
कन्या : कुटुंबातील सदस्यांशी चर्चा होईल. प्रेम जीवनात नवीन ऊर्जेचे स्त्रोत तयार होतील. दैनंदिन कामे उत्साहाने पार पाडाल. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुम्ही आज महत्त्वाची कामे पूर्ण करणार आहात. मित्रांसोबत वेळ घालवाल. कामाचा ताण वाढू शकतो. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. पती-पत्नींनी वेळोवेळी आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात.
तुळ : नवीन शत्रू निर्माण होतील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. आज तुम्ही एखाद्या समस्येबाबत तुमच्या नातेवाइकांबरोबर चर्चा कराल. मनोबल उत्तम राहील. काहींना अनपेक्षितपणे प्रवासाचे योग येणार आहेत.मालमत्तेच्या वादातून आज सुटका मिळेल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. व्यापारात अडकलेले काम गतीमान होईल. पण नवीन सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल नाही.
वृश्चिक : कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न कराल. वडिलांचा सल्ला घेऊ शकता. आजचे तुमचे आर्थिक नियोजन योग्य असणार आहे. महत्त्वाच्या गाठीभेटी पडणार आहेत. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सासरच्या व्यक्तीकडून पैसे घेताना काळजीपूर्वक घ्या. तुम्ही आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार आहात. व्यवसायात स्पर्धा वाढल्यामुळे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. प्रत्येक गोष्टीवर लक्ष देणे आवश्यक आहे.
धनु : जोडीदारासोबतचे वाद आज संपतील. आरोग्याच्या बाबतीत पालकांची काळजी घ्या. आजचे तुमचे नियोजन योग्य ठरणार आहे. तुम्हाला एखादी अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. अनेकांशी तुम्ही सुसंवाद साधणार आहात. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. धार्मिक कार्यात वेळ घालवाल. भागीदारीत फायदा होईल. तुमचे मन प्रसन्न राहील. जर पैसे उधार घ्यावे लागत असतील तर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त उधार घेऊ नका. व्यापारासंबंधी नवीन करार होण्याची शक्यता आहे, जो फायदेशीर ठरेल.
मकर : वाहन चालवताना काळजी घ्या, दुखापत होऊ शकते. इच्छुकांना लग्नाचे प्रस्ताव येतील. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. मनोबल कमी राहील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी. तुम्ही आज कोणावरही अवलंबून राहू नये. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंदी असाल. विनाकारण एखादा मनस्ताप संभवतो. प्रवास नकोत. व्यवसायात मीडिया आणि संपर्क स्त्रोतांद्वारे काही विशेष माहिती मिळू शकते. जी विस्तारासाठी फायद्याची ठरेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार ठिकाण बदल मिळू शकतो.
कुंभ : एखाद्या नवीन प्रकल्पावर काम कराल. सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ होतील. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहे. अपेक्षित गाठीभेटी सफल होणार आहेत. अडकलेले पैसे आज मिळू शकतात. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. आर्थिक लाभ होतील. आपण आपला संशयक स्वभावही बदलून लवचिकता आणावी. मशिनरी किंवा संबंधित साधनांच्या व्यवसायात योग्य ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.
मीन : जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. व्यवसायात कोणाचीही दिशाभूल करु नका. उत्साही राहाणार आहात. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे नियोजन योग्य ठरणार आहे. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी होणार आहात. कौटुंबिक वाद शांतपणे सोडवा. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. कार्यक्षेत्रात कष्टामुळे काही समस्या उद्भवू शकतात. पण चिडचिड करण्याऐवजी शांतपणे समस्या सोडवा. नोकरीदारांसाठी दिवस चांगला आहे.











