मेष : नोकरदार लोकांना नोकरीत बॉसकडून आदर मिळेल. तुम्ही आज तुमच्या जुन्या मित्रांना भेटाल, ज्यामुळे आनंदी असाल. महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील. प्रवास नकोत. वाहने जपून चालवावीत. भावाच्या प्रकृतीची चिंता आज सतावेल. तीर्थक्षेत्राला जाण्याचा प्लान कराल. आज आपणाला दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. दगदग व त्रास होईल.
वृषभ : मानसिक आणि शारीरिक श्रमामुळे थकवा जाणवेल. आज तुम्हाला धावपळ करावी लागेल. नोकरी, व्यवसायातील आर्थिक कामे दुपारनंतर होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. आर्थिक लाभ होतील. दुपारनंतर अनपेक्षितपणे प्रियजन भेटणार आहेत. रखडलेली कामे आज पूर्ण होतील. योग्य ठिकाणी पैसे गुंतवल्यास फायदा होईल. कामाचा ताण कमी होईल.
मिथुन : सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहकार्यांची उन्नती होईळ. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमचा प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. भाग्यकारक अनुभव येतील. काहींना मान-सन्मान लाभेल. आज तुम्हाला कामात शत्रूंपासून सावध राहावे लागेल. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्ही आपली मते इतरांवर लादणार आहेत.
कर्क : मुलांवरील विश्वास दृढ होईल. आईकडून प्रेम आणि आपुलकी मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामातील अडचणी दुपारनंतर कमी होतील. दीर्घकाळापासून व्यवसायात सुरु असलेल्या मेहनतीचे फळ आज मिळेल. प्रवासात काळजी घ्यावी.
सिंह : रागावर नियंत्रण ठेवून गोड शब्दांचा वापर करा, अन्यथा नात्यात दूरावा येईल. डोळ्यांशी संबंधित समस्या त्रास देतील. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्य सांभाळावे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. काहींना एखादी मनस्तापदायक घटना संभवते. कामात वडिलांचा सल्ला फायदेशीर ठरेल. मुलांच्या लग्नासंबंधित महत्त्वाचा निर्णय घ्याल. मनोबल कमी राहील.
कन्या : जोडीदाराला शारीरिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या समस्या वाढतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही नवीन ऑर्डर मिळतील. दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे तसेच इतर महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवास होतील. तुम्ही सर्वात कठीण कामे आज पूर्ण कराल. कुटुंबात सुरु असणारे वाद आज संपतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. कामाचा ताण कमी होईल.
तुळ : मुले आणि जोडीदार आनंदी असतील. मित्रांकडून तुम्हाला मदत मिळेल. नवीन कामात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ असेल. दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. मनोबल कमी राहील. वाहने सावकाश चालवावीत. कामाचा ताण वाढणार आहे. कुटुंबात नव्या व्यक्तीचे आगमन होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या नवीन संधी मिळतील. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. अनावश्यक कामात वेळ जाईल. मानसिक ताणतणाव राहतील.
वृश्चिक : व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साही राहाल. तुमच्या कामाने अनेक जण प्रभावित होणार आहेत. वादविवाद सुरु असेल तर त्यात यश मिळेल. जोडीदारच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे पैसे खर्च होतील. आनंदी घटना घडेल.
धनु : पोटदुखी आणि गॅसेसची समस्या उद्भवू शकते. त्यासाठी सावधगिरी बाळगा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. जिद्दीने कार्यरत राहाल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. कामाचा ताण असला तरी कामे उरकणार आहेत. कुटुंबात काही शुभ कार्यक्रमावर चर्चा होऊ शकतात. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. प्रवास सुखकर होणार आहेत.
मकर : इच्छा नसतानाही तुम्हाला काम करावे लागेल. जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. आरोग्य उत्तम राहील. प्रवास होतील. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. आज रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
कुंभ : आवश्यकतेनुसार खर्च करा. आर्थिक परिस्थितीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. महत्त्वाची आर्थिक कामे दुपारनंतर करावीत. तुमचा प्रभाव वाढेल. अनेक कामात सुयश लाभेल. प्रवासाचे योग येणार आहेत. व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागेल. वैवाहिक जीवन आज आनंदी राहिल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात.
मीन : सामाजिक सन्मान वाढेल ज्यामुळे आत्मविश्वास बळकट होईल. इतरांशी मैत्रीपूर्वक वागण्याचा प्रयत्न कराल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. उत्साह वाढेल. प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल.