मेष : भविष्याच्या अनेक चिंतापासून मुक्त व्हाल. मित्रांसोबत बाहेर जाण्याची संधी मिळेल. आपल्यापैकी काहींना आज मानसिक दुर्बलता जाणवणार आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. काहीजण आज करमणुकीकडे वळणार आहेत. व्यवसायात होणारी प्रगती पाहून तुम्हाला आनंद वाटेल. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. व्यवसायात वेळेवर काम करा. नक्कीच यश मिळेल. राजकारणातील तुमची प्रभावी भाषणशैली जनतेच्या मनावर चांगली छाप सोडेल.
वृषभ : आरोग्याच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर ठरेल. तुमच्यात कमाईत घट होऊ शकते. आपली बौद्धिक क्षमता आज आपण सिद्ध करू शकणार आहात. आपले मनोबल उत्तम राहील. आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत. प्रियजनांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. नात्यात समन्वय साधावा लागेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आनंदी राहाल. व्यावसायिक मित्राकडून सहकार्य आणि साहचर्य मिळेल. छपाईच्या कामात गुंतलेल्या लोकांना महत्त्वपूर्ण यश आणि सन्मान मिळेल. गायन क्षेत्रात सक्रियता वाढेल.
मिथुन : कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतो. तुमच्या व्यवस्थेत सुरु असलेल्या योजनांना टोकावर नेऊ नका. आपले मन आज आनंदी राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमच्यावर असणारा मानसिक ताण कमी होणार आहे. आज सर्वत्र तुमचा प्रभाव राहणार आहे. आईसाठी भेटवस्तू खरेदी कराल. संपत्तीशी संबंधित कोणत्याही बाबीत यश मिळेल. महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. नोकरीत बदल करण्याकडे कल वाढेल. व्यवसायाशी निगडित लोकांनी आपले उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा प्रयत्न करावा.
कर्क : व्यवसायात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरु शकते. मुलांच्या शिक्षणाबाबत आज तणाव निर्माण होईल. जिद्द वाढणार आहे. आज तुम्ही आपल्या मनोबलाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावणार आहात. आपली मानसिक ताकद वाढणार आहे. आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. व्यवसायात परस्पर स्पर्धा असणारी व्यक्ती तुमचे नुकसान करण्याच्या अनेक योजना बनवेल.
सिंह : उत्तम आरोग्यामुळे विविध कार्यक्रमात सहभागी व्हाल. कौटुंबिक व्यवसायात जीवनसाथीच्या सल्ल्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील व्यक्तींमध्ये विशेष सुसंवाद राहील. आर्थिक लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. भविष्यात याचा खूप फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत. स्वास्थ्य व समाधान लाभेल. अधीनस्थांना कामाच्या ठिकाणी अनावश्यक भांडणे होण्याची शक्यता आहे. राजकारणात यश मिळेल. उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला घरापासून दूर जावे लागेल.
कन्या : कोणताही निर्णय मनाने घ्याल. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. आज आपल्याला विशेष उत्साही वाटेल. गेले दोन दिवस जाणवत असणारी मानसिक मरगळ जाईल. मनोबल उंचावेल. तुम्ही इतरांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेणार आहात. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळख वाढेल. भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना विशेष यश मिळेल.
तुळ : तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये दूरावा येऊ शकतो. कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मनोबल कमी राहील. काहींना नैराश्य जाणवेल. आज आपल्याला दैनंदिन कामात विलंब अनुभवावा लागणार आहे. आज आपण शांत व संयमी राहावे. आज तुम्हाला पार्टनरशीपमधून लाभ होऊ शकतो. प्रवास शक्यतो आज नकोत. वाहने जपून चालवावीत. कारभारात सहभागी होण्याची संधी मिळेल. राजकारणात मोठे पद किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळेल.
वृश्चिक : काही काम धैर्याने करण्यात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी शत्रूंमुळे नुकसान होईल. बाहेर फिरण्याचा विचार कराल. आर्थिक लाभ होतील. जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याने आनंदी राहाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास उद्भवू शकतो. आज तुम्ही अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. सहलीला जाण्यापूर्वी, तुम्ही सध्याच्या परिस्थितीचे आकलन केले पाहिजे. उंच ठिकाणी जाणे घातक ठरू शकते.
धनु: आरोग्य आणि आर्थिक बाबीत लक्ष देणे गरजेचे आहे. घरात शुभ कार्य घडतील. कौटुंबिक ताण कमी होऊ शकतो. आपले मनोबल वाढेल. आज तुमच्या कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी निश्चित परिणाम देईल. आपल्याला मानसिक प्रसन्नता अनुभवायला मिळेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे सरकारी मदतीने दूर होतील. सरकारी सत्तेचा लाभ मिळेल. तुम्हाला राजकीय मोहिमेची कमान मिळू शकते.
मकर : तुम्हाला कठीण प्रसंगातून जावे लागू शकते. त्यामुळे संयम राखणे गरजेचे ठरेल. सामाजिक संबंधांमध्ये यश मिळेल. गेले दोन दिवस आपल्याला जाणवत असणारी अस्वस्थता कमी होणार आहे. आपले मनोबल उत्तम राहील. आज तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल घडतील. तुम्हाला तुमच्या नातेवाइकांच्या गाठीभेटी घेता येतील. जिद्दीने आज तुम्ही आपली सर्व कामे पूर्ण कराल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. व्यवसायात तुम्हाला कुटुंबातील वरिष्ठ सदस्याकडून सहकार्य आणि साहचर्य मिळेल.
कुंभ : कोणत्याही परिस्थितीत अतिरेक करणे टाळा, अन्यथा नुकसान होईल. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल होतील. भावनिक आधाराची गरज निर्माण होईल. आपल्या विचारांवर आपण ठाम राहावे. आपले मनोबल व आत्मविश्वास आज कमी असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी तणावाचा असू शकतो. तुम्ही इतरांना वर्चस्व गाजवणे टाळा. काहींना मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आळस आणि निष्काळजीपणा टाळा. तुमच्या मनातील सकारात्मकता वाढवा.
मीन : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. वैयक्तित नातेसंबंधात वाद उद्भवू शकतात. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. गेले दोन दिवस तुम्हाला जाणवणारी मानसिक अस्वस्थता आज कमी होणार आहे. तुम्ही बुद्धीने ते सोडवण्याचा प्रयत्न कराल. अहंकार सोडून नात्याला महत्त्व द्या. प्रवास सुखकर होतील रखडलेली दैनंदिन कामे मार्गी लावू शकणार आहात. राजकारणात मोठी भूमिका बजावू शकते. व्यवसायातील समस्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सोडवता येतील.