धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावरील धानोरा – जळगाव बसस्थानक परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून शुक्रवारी विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
यात प्रामुख्याने दोन महिन्यांपूर्वी धानोरा येथे वीज वितरणाचे सब स्टेशन मंजूर झाले होते व त्यांचे काम सुद्धा सुरू झालेले होते. मात्र, काही नागरिकांनी ठेकेदाराला मारहाण केल्याने काम बंद पडले आहे. तसेच कापसाला १२ हजार आणि केळीला बोर्ड भावाप्रमाणे दर मिळावा, अडावद येथे कायमस्वरूपी अभियंता नियुक्ती, कांद्याला शासनाने अनुदान दिले पाहिजे.अडावद येथे सब स्टेशन काम सुरू झाले पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी दि. २३ रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.