नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 36 वी पुण्यतिथी आहे. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या मारून त्यांची हत्या केली होती. इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक कणखर निर्णय घेतले होते, त्यामुळे त्यांना ‘आयर्न लेडी’ म्हणूनही ओळखलं जातं.
इंदिरा गांधींनी 1966 ते 1977 या दरम्यान सलग तीन वेळा देशाचं नेतृत्व केलं. 1980 साली दुसऱ्यादा पंतप्रधान पदावर पोहोचल्या आणि 31 ऑक्टोबर 1984 रोजी पदावर असतानाच त्यांची हत्या करण्यात आली.