मेष : आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. कामाचा वेग वाढवावा लागेल. दिवसभर व्यस्त राहाल. घरगुती खरेदीसाठी वेळ काढावा. आवड-निवड प्रदर्शित कराल. प्रवासात महत्त्वाच्या वस्तू सांभाळाव्यात.
वृषभ : आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगे – सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. स्वत:ची उत्तम छाप पडता येईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. तरुण वर्गात रमून जाल. नवीन मित्र जोडले जातील. झोपेची तक्रार जाणवेल.
मिथुन : आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती व पत्नी ह्यांच्याकडून लाभ होईल. छोट्याश्या सुखाने सुद्धा खुश व्हाल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मोलाचा सल्ला लाभेल. कामे मनाजोगी पार पडतील. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका.
कर्क : आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभ संभवतो. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामात प्रगतीचे पाऊल टाकता येईल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. वडीलधार्यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
सिंह : आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभ संभवतो. कलाकारांना अनुकूलता लाभेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. कामाचा आनंद घेता येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. कमिशनकडे लक्ष ठेवावे लागेल.
कन्या : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. अनुभवाचा वापर करता येईल. योग्य अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा.
तूळ : आजचा दिवस शुभ फलदायी असल्याने नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व व कृती संयमित ठेवणे हितावह राहील. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवास सावधगिरीने करावा. घरगुती समस्या जाणून घ्याव्यात. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. भागीदारीत नवीन योजना विचारात घ्याव्यात. मोठ्या लोकांशी ओळख होईल.
वृश्चिक : आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज – मजा, मनोरंजन व एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे आज आपण खूप आनंदी राहाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. भावंडांना मदत कराल. कामाला चांगली गती येईल. हातात नवीन अधिकार येतील. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल.
धनू : आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत लाभ व सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. कौटुंबिक प्रश्न निग्रहाने सोडवावेत. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक स्थैर्य जपावे. जवळचे मित्र भेटतील.
मकर : आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल. शक्यतो आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आज आपणास नशिबाची साथ न मिळाल्याने आपणास नैराश्य येईल. दिवसभर कामात गढून जाल. आततायीपणे कोणतेही निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या शब्दाला धार येईल. वेळेचे भान राखावे.
कुंभ : आज आपण अती संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन व अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर – संपत्ती किंवा वाहन ह्यांचे कागदपत्र बनवताना सावध राहावे. नसती काळजी करू नये. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. घर टापटीप ठेवाल.
मीन : आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक व कलात्मक शक्ती वाढेल. मित्र व कुटुंबियांसह एखाद्या प्रवासाला जाल. भावंडां कडून फायदा होईल. जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करता येईल. लहान प्रवास कराल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मुलांच्या बाबतीत अधिक लक्ष घालावे. घरगुती कामे उत्तमरीत्या पार पाडाल. (Today Rashi Bhavishya, 27 March 2023)