मेष : भावनेच्या भरात कोणालाही वचन देऊ नका. तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जाईल. काहींना विविध लाभ होणार आहेत. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकणार आहात. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. आज तुमच्या व्यवसायात कोणावरही अवलंबून राहू नका, अन्यथा नुकसान होईल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. आज तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं कौतुक होऊ शकतं.
वृषभ : नोकरी करत असाल तर नवीन काम सोपवले जाईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. कौटुंबिक व्यवसायात भाऊ-बहिणीचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेम जीवनात आनंदी राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा दबदबा राहील. शेतीची कामं करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन : तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात जबाबदारीचे काम सोपवले जाईल. प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्यामध्ये असणारी जिद्द व चिकाटी वाढणार आहे. आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्वत:ला कमकुवत समजू नका. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण तुम्ही या आजारांकडे दुर्लक्ष करू नये.
कर्क : रागाच्या भरात केलेली चुक अडचणीचे कारण बनू शकते. त्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्या. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहणार आहे. आज रागावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तुमचे काम यशस्वी होईल. व्यवसायातील आर्थिक कामे यशस्वी होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. चिकाटी वाढणार आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल.
सिंह : व्यावसायिक विरोधक तुमच्याविरुद्ध कट रचतील. त्यामुळे सावध राहा. आरोग्य उत्तम राहणार आहे. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. वैवाहिक सौख्य लाभेल. राजकीय क्षेत्रात रुची वाढेल. ज्यामध्ये पैसे खर्च होतील. कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान कराल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. उत्साही राहाल. किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो.
कन्या : व्यवसायात फायदेशीर परिणाम मिळतील. प्रेमप्रकरणात परिस्थिती पाहून उत्तर द्या. काहींना निरुत्साह जाणवणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. रखडलेले काही काम आज पूर्ण होतील. त्यामुळे प्रयत्न करा. दैनंदिन कामे रखडणार आहेत. अस्वस्थता राहील. प्रवास टाळावेत. आज तुम्ही आत्मविश्वासाने काम केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचं उत्पन्न वाढू शकतं.
तुळ : एखादा नवीन प्रस्ताव स्विकारताना असमर्थता दाखवाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्याने कामात यश मिळेल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. तुमचे मन अत्यंत आनंदी राहणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. आज तुम्हाला जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. नवे स्नेहसंबंध जुळतील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. विविध लाभ होतील. जे वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात त्यांना आज अधिक फायदा होऊ शकतो.
वृश्चिक : नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आज मिळेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. नवीन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्यांना परिणाम चांगले मिळतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. स्वास्थ्य लाभणार आहे. आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामाकडे नीट लक्ष द्या. आज तुमच्या हातून काही चूक घडू शकते.
धनु : नोकरी-व्यवसायात सर्व कामे तत्परतेने कराल. प्रवास सुखकर होणार आहेत . मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. कामात विलंब करु नका, नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्द वाढणार आहे. व्यवसायात नवीन बदल करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली आहे. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर काही गैरसमजामुळे तुमच्या व्यवसायातील भागीदाराशी तुमचं नातं बिघडू शकतं.
मकर : भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. आज मालमत्तेशी संबंधित काही कायदेशीर वाद असतील तर ते जास्त ओढू नका. आज तुम्हाला एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आरोग्य जपावे. आर्थिक स्थितीसाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. काहींवर एखादे भावनिक दडपण राहील. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.
कुंभ : विद्यार्थ्यांना पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागेल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन व इतर महत्त्वाच्या कामात दिवस विशेष अनुकूल आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. नोकरीच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळेल. मनोबल वाढेल. आज तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात उच्च पद आणि स्थान प्राप्त होणार आहे. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात.
मीन : तुमचा मान वाढेल. रखडलेली कामे आज पूर्ण करण्याचा दिवस आहे. आर्थिक कामास दिवस अनुकूल नाही. दैनंदिन आर्थिक कामे जपून करावीत. कामात आळशीपणा दाखवू नका, अन्यथा नुकसान होईल. प्रवासात व वाहने चालवताना विशेष दक्षता घ्यावी. आर्थिक चणचण कमी होण्याची शक्यता आहे. प्रतिकूलता जाणवणार आहे. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल.













