मेष : आज जर तुम्ही कुठूनतरी पैसे उधार घेण्याचा किंवा बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला ते सहज मिळेल. आज नातेवाईक भेटीला येतील. त्रास देणार्या लोकांपासून दूर राहावे. आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास व प्रवास ह्यासाठी उत्तम आहे.
वृषभ : आज तुम्ही तुमचे पैसे कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात होणार्या नफ्याने समाधानी असाल. विद्यार्थ्यांना आव्हानात्मक दिवस असेल. कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल.
मिथुन : आईच्या तब्येतीत फरक दिसून येईल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात जागृत होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या थोडे सावध राहण्याचा दिवस असेल, त्यामुळे आज तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील.
कर्क : आज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याबाबत सतर्क राहावे लागेल. त्यांना काही समस्या असल्यास, कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. अति विचार करू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. लहानांसोबत वेळ घालवाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील.
सिंह : आज तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्राकडून आर्थिक मदत मागितली तर ती तुम्हाला सहज मिळेल. जर तुम्हाला डोळ्याशी संबंधित काही समस्या असतील तर ती वाढू शकते. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. इतरांच्या विचारांना देखील प्राधान्य द्या. धनवृद्धि संभवते. विचारात एकसुत्रीपणाचा अभाव जाणवेल.
कन्या : आज तुमच्या मनात निर्भयतेची भावना असेल आणि त्याचे परिणामही खूप शुभ होतील. जर तुमचा तुमच्या पत्नीशी काही वाद होत असेल तर तोही आज संपुष्टात येऊ शकतो. आजचा दिवस धावपळीचा असेल. घराचा बजेट बिघडणार नाही याची दक्षता घ्या. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद व शांतता लाभेल.
तूळ : आज तुम्ही तुमच्या नातेवाईकाच्या घरी जाऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही उत्साहवर्धक बातम्या देखील ऐकू येतील. पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. परंतु हा पैसा घरातील गोष्टींवर खर्च होईल. मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. नोकरी – व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : आज जर कुटुंबात काही वाद चालू असतील तर असे काही ऐकू येईल की ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल परंतु तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका कारण संध्याकाळपर्यंत कुटुंबातील वरिष्ठ सदस्य त्यावर उपाय शोधून काढतील. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. प्रवास फायदेशीर ठरेल. थकवा दूर पळून जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. परंतु दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल.
धनू : आज व्यवसायात थोडासा फायदा झाला तरी तुम्ही समाधानी दिसाल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना पाठिंबा देण्यात यशस्वी व्हाल. घरातील लोकांसोबत अधिक वेळ घालवाल. घरातील लोकांना खुश कराल. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल.
मकर : आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी काही पैसे खर्च करावे लागतील, तरच तो भविष्यात कुठेतरी पोहोचू शकेल. वेळेचा सदुपयोग करून घ्यावा. रखडलेली कामे पूर्ण करता येतील. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला तर आज खूप फायदा होऊ शकतो. व्यापार – व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल.
कुंभ : आज तुमचा एखादा नातेवाईक तुमचा विश्वासघात करू शकतो, परंतु तुम्ही तुमच्या हुशारीचा वापर करून ते टाळू शकाल. दुपार नंतर नकारात्मक विचार मनात येतील. आज तुम्ही काही ऐहिक सुखसोयींवरही खर्च कराल.आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.
मीन : आज तुमच्या आनंदी जीवनामुळे, इतर लोक तुमच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे तुमच्या मित्रांची संख्या देखील वाढेल. व्यापार – व्यवसायावर सरकारी हस्तक्षेप वाढेल. अति विचार करत बसू नका. मानसिक चंचलता जाणवेल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
















