मेष : आज थोडा खर्च जास्त होणार आहे. तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.अगदी छोटासा त्रास झाला तरी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार कराल. आज शारीरिक व मानसिक उत्साह अनुभवाल.
वृषभ : गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण आज गुंतवणूक केली तर फार फायदा होणार नाही. नवीन काम अंगावर येऊ शकते. दिवस बर्यापैकी व्यस्त राहील. कामे उरकताना दमछाक होऊ शकते. आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन आपला फायदा होईल.
मिथुन : पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थां पासून सावध राहा. आज कोणाबरोबर बोलताना खूप विचार करुन बोला कारण तुमचे खडे बोल समोरच्याचे मन दुखावू शकता. नियोजनबद्ध कामे करा. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका. चंचलतेवर मात करावी लागेल.
कर्क : मित्र व स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. कायदेशीर प्रकरणात आज निर्णय काही होणार नाही उलट काही काळासाठी ते प्रकरण पुढे ढकललं जाईल. आपल्या धाडसाचे फळ मिळेल. कचेरीची कामे मार्गी लावाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना मनासारखा निकाल मिळाल्याने आनंद होईल.
सिंह : स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे तुम्हाला जॉब ऑफर येतील. तसेच आज आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. लहान प्रवास घडेल. कामात अनुकूलता येईल. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल.
कन्या : उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. वातावरण बदलामुळे होणाऱ्या आजाराचा तुम्हाला त्रास होईल. संध्याकाळी थकवा, डोकेदुखी, ताप अशा काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मानसिक स्वास्थ्य जपावे. इतरांना सढळ हाताने मदत कराल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल.
तूळ : तुमच्या कुटुंबातील किंवा नोकरीतील कोणत्याही अधिकाऱ्याशी वाद झाला असेल, तरी तुमच्या बोलण्यात कटूता नसावी. महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. संभ्रमित गोष्टी पुढे ढकलाव्यात. दिवस संमिश्र राहील. आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत टाकेल.
वृश्चिक : मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवाल. आज तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. पण जर तुम्ही असे काही केले नाही तर यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. एखादी नवीन संधी चालून येईल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते. गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका.
धनू : मैत्रिणींकडून लाभ होईल. तुम्ही एखाद्या मैत्रीणीला पैसे उधार दिले तर ते पुन्हा परत मिळतील की नाही याबद्दल शंका आहे, त्यामुळे विचार करुनच कृती कराल. घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील.
मकर : व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. आज तुम्ही तुमच्या कोणत्याही विरोधकांमुळे अडचणीत आलात तरी बोलण्यात कटूता ठेवू नका, अन्यथा विरोधक तुमच्याविरोधात नवी योजना आखू शकतात. अति धाडस दाखवू नका. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. जुगार खेळतांना सावध राहावे.
कुंभ : पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा आणि जनतेचा आर्शिवाद तुमच्यासोबत आहे. आज एखाद्या जवळच्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. फसवणुकीपासून सावध राहावे. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरगुती गैरसमज टाळावेत. आज आपण नकारात्मक विचारा पासून दूर राहावे.
मीन : सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून एखादी भेट वस्तू दिली जाऊ शकते, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचा विचार कराल. काही खर्च अचानक सामोरे येतील. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा.