मेष : आज उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने काम करा. महत्त्वाच्या कामांमध्ये अनुकूलता लाभणार आहे. घरगुती बाबींकडे तुम्ही अधिक लक्ष द्यावे. तुमचा आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडणार आहेत.कामाचे नीट नियोजन करा. मनोबल उत्तम राहील. जिद्द वाढेल. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत.
वृषभ : आज शेअर मार्केट सोडून पैशाची गुंतवणुक करण्यास प्राधान्य द्या. आज दुपारनंतर आपणाला मानसिक स्वास्थ्य लाभेल.मुलांसाठी खर्च करावा लागू शकतो. चिंता कमी होतील. आज दैनंदिन कामे दुपारनंतर पूर्ण होणार आहेत. संधीची संयमाने वाट पहा. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा.
मिथुन : आज लाभदायक असतील तेच व्यवसाय करा. दैनदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. जोडीदारासोबत खूप चांगला वेळ व्यतीत कराल. दुपारनंतर काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. कामाचा ताण जाणवेल. आज पांढऱ्या वस्तूचे दान करा. तसेच वाहन सावकाश चालवावीत. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा.
कर्क : आज कुटुंबीयांमुळे त्रास होऊ शकतो. दुपारनंतर आपले मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे.व्यवसायात असणाऱ्या उणीवांवर आज मात कराल. काहींना मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर करावीत.आज तुम्ही व्यवहारी आणि शिस्तबद्ध वागण्याचा प्रयत्न करा. कामानिमित्त प्रवास घडेल. उष्णतेचा त्रास संभवतो.
सिंह : एक व्यावसायिक म्हणून तुम्ही चांगले काम कराल. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. दुपारनंतर आपणाला एखादी मनस्तापदायक घटना संभवते. तूर्तास जमिनीची कामे करू नयेत. कष्टाप्रमाणे लाभ मिळेल. आपण दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. कामाचा ताण कमी होणार आहे. प्रवास आज नकोत. कर्ज प्रकरणे पुढे ढकला.
कन्या : लहान प्रवास घडेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजांकडे लक्ष देण्याची गरज. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना दुपारनंतर अनुकूलता लाभेल. आपले आरोग्य उत्तम राहील. आज सुखद आश्चर्याचा धक्का बसेल. मनोबल वाढेल. आपल्या वरिष्ठांना संतुष्ट कराल. काहींना दुपारनंतर अनपेक्षितपणे मित्र-मैत्रिणी भेटणार आहेत.
तुळ : जोडीदाराशी मतभेद होतील. गुंतवणुकीची कामे दुपारनंतर करावीत. विवाहबाह्य संबंधांपासून तुम्ही सावध राहा. आपले आरोग्य उत्तम राहील. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवा. आपल्याला मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आपले मनोबल उत्तम असणार आहे. कामाचा ताण कमी होईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
वृश्चिक : कौटुंबिक जीवन सामान्य राहील पण काही मुद्द्यांवर कुटुंबीयांसोबत मतभेद होतील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत रहाणार आहात. अनपेक्षित परिस्थिती निर्माण होईल. आततायीपणा करू नये. आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अनपेक्षितपणे नातेवाईक भेटणार आहेत. रागाचा पारा चढू देवू नका.
धनु : प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कामाचा ताण कमी होणार आहे. दुपारनंतर काहींना अनपेक्षितपणे धनलाभ होणार आहेत. मोठ्या सुट्टीची योजना आखा. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. खर्चाचे प्रमाण लक्षात घ्यावे. घरातील जबाबदारी उचलाल.
मकर : व्यावसायिक भागीदारी आज नफ्यात राहील. दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. व्यावहारिक राहून आपल्या करिअरसाठी आज सजग रहा. प्रवासाचे नियोजन दुपारनंतर करावे. आपली दैनंदिन कामे आपण दुपारनंतर मार्गी लावू शकणार आहात. आर्थिक लाभ होणार आहेत. वागण्यातून आत्मविश्वास दर्शवाल.
कुंभ : खर्चांमुळे तुमची कमावलेली आर्थिक स्थिरता बिघडू शकते. दुपारनंतर तुमचे मनोबल कमी राहील. कामाचा व्याप वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. प्रेमाची कबुली देताना तुमच्या मैत्रीच्या नात्याला छेद जाणार नाही, याची काळजी घ्या. प्रवासाचे नियोजन शक्यतो आज नको. काहींना मनःस्ताप संभवतो. व्यावसायिक बदल कराल. दैनंदिन कामे रखडणार आहेत.
मीन : व्यावसायिक जीवनात तुमचा दृष्टीकोन खूप सकारात्मक असेल. आर्थिक कामात दुपारनंतर सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील. करिअरमध्ये फायदा होणार प्रवास सुखकर होणार आहेत. कामाचा ताण कमी असणार आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. आनंदी व आशावादी असणार आहात. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील.