मेष : जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस ! महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपर्यंत पुर्ण करावीत. कोणा अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याला फसू नका. धनहानी होऊ शकते. थोड्या प्रयत्नांनी तुमची कामे होतील. मानसिक स्वास्थ्य देणारी एखादी वार्ता समजणार आहे. कामात सहकार्यांची मदत घेता येईल. कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्याल.
वृषभ : शारीरिक कष्ट होऊ शकतात. उत्साह व उमेद उत्तम राहणार आहे. व्यवसाय ठीक राहील आणि उत्पन्न येत राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कामे यशस्वी होणार आहेत. कुटुंबीयांसोबत एखाद्या मुद्द्यावर वादविवाद होऊ शकतात. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार. कमिशनच्या कामातून लाभ होईल. मनोबल उत्तम राहील.
मिथुन : आज वाहन आणि मशिनरीचा वापर करताना सावध राहणे आवश्यक आहे. काहींना नैराश्य जाणवणार आहे. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो आज नकोत. नोकरीतील हाताखालच्या लोकांसोबत मतभेद होऊ शकतात, संयम ठेवा. काहींना आराम करावा वाटेल. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे.
कर्क : आर्थिक कारणांमुळे कुटुंबात ताणताणाव राहिल्याने धुसफूस होत राहील. कामाचा व्याप वाढणार आहे. मुलामुलींना वेळ देऊ शकाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. उद्यापासून परिस्थिती निवळण्यास सुरुवात होईल. पत्नीशी मतभेद संभवतात. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. प्रवास होतील.
सिंह : बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, तसा प्रयत्न करा. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी होणार आहात. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामे व इतर महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत.आपल्या आणि कुटुंबियांच्या तब्बेतीची चिंता राहील. तुमचा प्रभाव वाढणार आहे. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.
कन्या : अपेक्षित कामात उशीर होऊ शकतो. चिंता आणि ताण राहील.तुमचे मन अत्यन्त आनंदी व आशावादी राहणार आहे. जिद्दीने कार्यरत रहाणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. व्यवसायात लाभ होईल. आज तुमच्या बोलण्यात अधिक स्पष्टता असेल. मानसिक उमेद वाढेल. एकमेकांमधील प्रेमळ सहवास वाढीस लागेल.
तुला : आज कुटुंबीय आणि प्रिय व्यक्ती सोबत वादविवाद होऊ शकतात. मानसिक ताणतणाव राहिल्याने अस्वस्थता वाढणार आहे. वादविवादात सहभागी होण्याचे टाळावे. व्यवसाय चांगला चालेल. कौटुंबिक वातावरणात काही चढ उतार राहतील. प्रवासात विशेष काळजी घ्यावी. मनोबल कमी राहील. आकर्षणाला बळी पडू नका.
वृश्चिक : कौटुंबिक सुख आणि समाधान मिळेल. गुंतवणूक शुभ राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. कामाचा ताण कमी होईल. तुमचा उत्साह व उमेद विशेष असणार आहे. प्रेमातील आकर्षणापासून सावध राहा. मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्य उत्तम राहील. छंद जोपासण्यास वेळ देता येईल.
धनु : जुना आजार उफाळू शकतो. आज व्यवसायावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कामात अडचणी जाणवणार आहेत. कामे रखडण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामांचे नियोजन आज नको. तुमचा जमाखर्च बिघडू शकतो. एखादा शोक संदेश मिळू शकतो, संयम ठेवा. कामाचे योग्य नियोजन कराल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.
मकर : शारीरिक कष्ट होऊ शकतात, सावध राहा. महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. संतती सौख्य लाभणार आहे. आत्मविश्वासाची कमतरता जाणवणार आहे. गुंतवणूक शुभ राहील. काहींची बौद्धिक प्रगती होईल. प्रवासात काळजी घ्यावी.
कुंभ : बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नात मना प्रमाणे वाढ होईल. मानसिक प्रसन्नता आपल्याला विशेष उत्साही ठेवणार आहे. नोकरी, व्यवसायतील महत्त्वाचे व्यवहार आज पूर्ण होणार आहेत. गुंतवणूक शुभ राहील. दुपारनंतर अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. मनोबल वाढेल. घरात सुख शांती येऊ शकते. क्षुल्लक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा.
मीन: व्यवसायात लाभ होईल आणि गुंतवणूक शुभ राहील. वाईट लोकांपासून लांब राहा. जिद्दीने कार्यरत रहाणार आहात. चिकाटी वाढणार आहे. अनपेक्षितपणे नातेवाईकांच्या गाठीभेटी पडणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. घरी पाहुणे येतील. आत्मविश्वास वाढेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कामातील बदल समजून घ्यावेत.