मेष :- मालमत्तेशी संबंधित एखाद्या कायदेशीर प्रकरणात तुम्हाला यश मिळू शकते. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. आज सकारात्मक फळ मिळणार आहे. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन मित्र जोडाल. कायदेशीर प्रकरणात यश मिळेल. झोपेची तक्रार जाणवेल. तरुण वर्गात अधिक वेळ घालवाल.आज तुम्ही शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करू शकता.
वृषभ :- आजचा दिवस आनंदात जाणार आहे. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. व्यावहारिक कल्पकता वापराल. आज कामाच्या ठिकाणी तुमचे अधिकारीही तुमच्या कामाचे कौतुक करतील. पुढील गोष्टींचा अंदाज बांधवा लागेल. आज रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. काही बाबी उघडपणे बोलणे टाळाल. अधिकारी व्यक्तींची गाठ घ्यावी लागेल. बजेटनुसार पैसे खर्च करा, अन्यथा महिन्याच्या अखेरपर्यंत खिसा रिकामा होऊ शकतो.
मिथुन :- आज पैशांचे व्यवहार करताना सावधान राहाल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. चांगली संगत लाभेल. आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. पैशांचे व्यवहार करताना तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. मोठ्या लोकांच्या संगतीत वावराल. व्यावसायिकांना काही अडचणी येतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. पैशाचं व्यवस्थापन अतिशय हुशारीने करा. तुमच्या खर्चाकडे नीट लक्ष द्या, आज जास्त खर्च करू नका.
कर्क :- आजचा दिवस प्रगतीचा दिवस असेल. मानसिक ताणापासून दूर राहावे. घरातील वडीलधार्या व्यक्तींचे मत विरोधी वाटू शकते. व्यावसायिकांसाठी दिवस संमिश्र राहील. अंगीभूत कलागुण विकसित होण्यास वाव द्यावा. कामाच्या ठिकाणी काही नवीन शिकायला मिळेल. अति विचार करणे टाळावे. वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. आज तुम्ही पैशाचे व्यवहार टाळा. कुणालाही पैसे देऊ नका, तुम्हाला पैसे परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
सिंह :- आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला आहे. जोडीदाराशी विचार-विनिमय कराल. भागीदारीत नवीन योजना आमलात आणाल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. मुलांच्या हट्टीपणा कडे लक्ष ठेवा. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला जुन्या मित्र किंवा मैत्रिण भेटेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आज व्यावसायिक जीवनात अनेक मोठे सकारात्मक बदल घडतील. तुम्हाला सगळीकडून नफा मिळेल.
कन्या :- आज आर्थिक स्थिती मजबूत होईल. पत्नीची प्रगती होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. आज कोणालाही पैसे उधार देणे टाळावे लागेल. जुगारातून लाभ संभवतो. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून काही निराशाजनक माहिती मिळेल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल. व्यावसायिकांनी गुंतवणुकीसंबंधीचे निर्णय अत्यंत हुशारीने घ्यावे. खूप धोकादायक प्रकल्प सुरू करणं टाळा.
तूळ :- वैवाहिक जीवनात आज गोडवा येणार आहे. पत्नीचा वरचष्मा राहील. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. खूप दिवसांनी एखादा मित्र अथवा मैत्रीण भेटल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. आरोग्यात सुधारणा होईल. आज व्यवसायातील समस्या दूर होतील. जवळचा प्रवास जपून करावा. कामाचा जोम वाढेल. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तरीही, पैशाशी संबंधित निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या.
वृश्चिक :- नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. बोलतांना सारासार विचार करून बोलावे. आज आई-वडिलांचा आशीर्वाद नक्की घ्या. कसलाही उतावीळपणा करायला जाऊ नये. कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे. वाद मिटवण्यासाठी तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांशी समेट करू शकता. घरात नातेवाईक जमा होतील. दिवस हसत-खेळत घालवाल. आज व्यवसायात अधिक लक्ष द्या.तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि जास्त ताण घेऊ नका.
धनू :- आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. रागाचा पारा आवरता घ्यावा लागेल. आततायीपणे वागू नये. व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी तुम्हाला काही लोकांशी सुसंवाद साधावा लागेल. कामाचा जोम वाढीस लागेल. काही अनपेक्षित बदल संभवतात. नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे. आज पती-पत्नीच्या नात्यात गैरसमज वाढतील, परंतु संयम ठेवा आणि शहाणपणाने निर्णय घ्या.
मकर :- आजचा दिवस सकारात्मक परिणाम देणारा आहे. सामुदायिक गोष्टीपासून दूर राहावे. स्त्रीवर्गापासून सावधानता बाळगावी. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्हाला संयम बाळगावा लागेल. धार्मिक यात्रा कराल. प्रवासात सावधानता बाळगावी लागेल. व्यावसायाशी संबंधित लोकांशी तुमचे संबंध सुधारतील. वादविवादात सामील होणे टाळा. हुशारीने गुंतवणूक करा आणि आर्थिक बाबतीत कोणतीही जोखीम घेऊ नका.
कुंभ :- व्यवसाय करणारे लोक नवीन प्रकल्प सुरू करू शकतात. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. तुमच्या संभाषण कौशल्यावर सर्व खुश होतील. तुमच्या मुलांशी काही मुद्द्यांवर खटके उडू शकतात. व्यावहारिक चातुर्य दाखवून द्याल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. मोठी गुंतवणूक केली तर त्यात तुमच्या पदरी निराशा पडू शकते.हातातील कला जोपासावी. आज काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
मीन :- एकाच वेळी अनेक कामे हाताशी असल्याने तुमची चिंता वाढू शकते. वेळेचे महत्व जाणून वागावे. कोणालाही शब्द देतांना विचार करावा. पण तरीही तुमच्या मेहनतीला आज फळ मिळेल. व्यावसायिक लाभाचे योग्य नियोजन करावे. दिखाऊपणासाठी जास्त पैसे खर्च कराल. चटपटीत पदार्थ खाल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल. आज तुम्ही आवश्यक घरगुती वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणं खरेदी करण्याचा विचार करू शकता.