मेष : आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आपला आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुमच्या मुलांना दिलेले वचन पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. गुंतवणुकीसाठी थोडं थांबा, घाई करू नका.
वृषभ : कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा होईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाणार आहे. अनावश्यक कामात तुमचा वेळ व पैसा खर्च होणार आहे. काहींना अनावश्यक काळजी व चिंता सतावतील. मच्या व्यवसायाकडे नीट लक्ष द्या, अन्यथा नुकसान व्हायला वेळ लागणार नाही.
मिथुन : आज तुम्हाला काही फसव्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. संततीसौख्य लाभणार आहे. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. मनोबल वाढणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळेल आणि त्यामुळे तुमचं कर्जही फिटेल.
कर्क : आज कोणाबद्दलही वाईटवाकडं बोलू नका. मानसिक प्रसन्नता राहणार आहे. आपले मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी करू शकणार आहात. व्यवसायात काही अडचणी येत असतील तर त्यात आज सुधारणा होईल. प्रवासामध्ये आंनददायी अनुभव येणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारावर विश्वास ठेवून काम करा.
सिंह : आज तुमचे काही विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमचे मन आनंदी व आशावादी राहील. अनेक कामांत आज आपणाला अनुकूलता लाभणार आहे. पूर्वी एखादी चूक केली असेल तर आज त्याबद्दल माफी मागावी लागेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात अनावश्यक तणाव निर्माण करू नका. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अजून प्रयत्न करावे लागतील.
कन्या : आज तुम्ही मोठ्या गुंतवणुकीची योजना करू शकता. कामाचा ताण राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवासात विलंब लागेल. कामे अडकणार आहेत. प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. व्यवसायात तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थिती नीट हाताळाल.
तूळ : तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या सल्ल्याकडे पूर्ण लक्ष द्याल. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करणारे लोक आज मोठा करार पूर्ण करू शकतात. आज तुम्ही इतरांसाठी तत्पर राहणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. तुम्हाला व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : आज तुम्ही सामाजिक कार्यातही पूर्ण समर्पणाने सहभागी व्हाल. व्यवसायात आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. कामे लक्षपूर्वक करावीत. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल असे दिसत आहे.आर्थिक देवाणघेवाण करताना सावधानता ठेवावी. आपली दैनंदिन कामे आज विलंबाने होणार आहेत. व्यवसायाशी संबंधित लोकांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल.आजचा दिवस खूप चांगला जाईल.
धनु : व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला सहकार्य लाभणार आहे. संततीसौख्य लाभेल. मुलांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणींपासून बऱ्याच अंशी सुटका होईल. आर्थिक कामास आजचा दिवस अनुकूल असणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. व्यावसायिक लोकांना आज एखादा नवीन भागीदार मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आळशीपणाने भरलेला असेल.
मकर : आज आरोग्याबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नका. प्रवासास आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. कामाचा ताण कमी होणार आहे. कोणालाही कसलेली वचन देऊ नका, नाहीतर ते पूर्ण करणे जड जाऊ शकते. काहींना व्यवसायानिमित्त अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.
कुंभ : आजचा दिवस खर्चिक असणार आहे. काहींना नोकरीनिमित्त प्रवास करावा लागेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात संयम बाळगा. आत्मविश्वासपूर्वक आजची आपली कामे तसेच दैनंदिन कामे आपण पूर्ण करणार आहात.व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. मनोबल वाढणार आहे. व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात.
मीन : आज व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. काहींना आर्थिक लाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक जीवनात आपण सुसंवादी राहणार आहात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कायदेशीर वादात तुम्हाला विजय मिळू शकेल. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत. व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात.