मेष : दिवस थोडा त्रासदायक ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंद लाभेल. कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. व्यापारी वर्ग मोठ्या अधिकाऱ्यांना भेटू शकतात. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. काहींना गुप्त वार्ता समजतील. मनोबल उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या भूतकाळातील काही चुका उघडकीस येऊ शकतात.
वृषभ : व्यावसायिकांनी एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर तुम्हाला ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे. काहींना नवा मार्ग दिसेल. तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. तुमच्या कुटुंबातील जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण प्रयत्न करून पार पाडाव्यात.
मिथुन : तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि आज कोणतेही प्रकरण सौम्यपणे हाताळा. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामात अडचणी आल्याने मन नाराज राहील. निरुत्साही राहाल. खर्च वाढणार आहेत. कोणत्याही चुकीच्या कामाला होकार देऊ नका, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल.
कर्क : आजचा दिवस व्यावसायिकदृष्ट्या चांगला असेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. आज आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आपले पैसे वाचवा. सामंजस्य राहील. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहणार आहे. अपेक्षित गाठीभेटी पडतील. गुरूकृपा लाभेल. उचित असे मार्गदर्शन लाभणार आहे.
सिंह : आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. सर्वत्र अनुकूलता लाभणार आहे. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा राहील. आरोग्याचा ताण कमी होईल. अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. नेटवर्किंग क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना आज चांगला नफा मिळू शकतो.
कन्या : आज तुम्हाला सुट्टी नसेल तर ऑफिसमध्येही तुम्ही चांगलं काम कराल. संततिसौख्य लाभणार आहे. मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकाल. तुमचा प्रभाव राहील. तुम्हाला बढती मिळू शकते आणि पगारवाढ मिळू शकते. आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही विषयावर वादविवाद करणे टाळावे लागेल.
तुळ : आज तुमच्या तब्येतीत अस्वस्थता जाणवू शकते, म्हणूनच तुम्ही कामापेक्षा विश्रांतीला जास्त महत्त्व दिले पाहिजे. दैनंदिन कामे त्रासदायक वाटतील. काहींना नैराश्य जाणवेल. तुमची कार्यक्षमता पाहून तुमचे अधिकारी तुमच्यावर खुश असतील. प्रवास टाळावेत. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. खूप खस्ता खाल्ल्यानंतरच तुम्ही यश मिळवू शकाल. परंतु तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणे टाळावे लागेल.
वृश्चिक : जे ऑनलाइन काम करत आहेत त्यांना त्यांच्या डेटाच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नातेवाईक भेटतील. प्रवास सुखकर होतील. आरोग्याचा त्रास कमी होईल. मनोबल उत्तम असणार आहे. आज डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते.
धनु : आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. प्रवासात व वाहने चालवताना दक्षता घ्यावी लागणार आहे. अतिउत्साहीपणा नको. आज पैसा हुशारीने खर्च करा. कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. खर्च वाढणार आहेत. पैशांची बचत करण्यावर भर द्या. नवीन वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. तुम्ही तुमच्या काही आरामदायी वस्तूंच्या खरेदीवरही भरपूर पैसे खर्च कराल.
मकर : आज आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. प्रियजनांबरोबर सुसंवाद साधण्याची संधी मिळणार आहे. आर्थिक कामे होतील. आज आर्थिक स्थिती मजबूत होईल. अपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. उत्साही व आनंदी राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. हितशत्रूवर मात कराल. आजच्या दिवशी एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळवण्याची शक्यता आहे.आज तुम्हाला रचनात्मक कार्यातही यश मिळेल.
कुंभ : हितशत्रूवर मात कराल. आजचा आपला संपूर्ण दिवस उत्साहात व आनंदात जाणार आहे. कामे मार्गी लागणार आहेत.नोकरीत तुम्हाला नवीन संधी मिळतील, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. दैनंदिन कामात सुयश प्राप्त होणार आहे. चिकाटी वाढणार आहे. घरातील आणि बाहेरील लोकांशी ताळमेळ राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. आज खूप खस्ता खाल्ल्यानंतरच तुम्ही यश मिळवू शकाल.
मीन : व्यवसायातून आर्थिक लाभ होईल आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. तुमच्यामध्ये असणारी जिद्द व चिकाटी वाढणार आहे. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडणार आहेत. तुमच्या खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवा. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागेल. विरोधकांपासून सावध राहावे लागेल, नाहीतर ते तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.