मेष : आज नोकरी – व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. छोट्या व्यावसायिकांना आज रोकड कमी पडू शकते. मनातील जुनी इच्छा पूर्ण कराल. गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील. आजचा प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज समाजात तुमचा सन्मान वाढेल.
वृषभ : मनात वैचारिक गोंधळ उडाल्याने आज आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. नोकरीच्या ठिकाणी व्यापारी किंवा अधिकाऱ्याशी तुमचावाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अति घाई करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. आज आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
मिथुन : धार्मिक स्थळी मन रमेल. दानधर्म कराल. उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. पण आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी किंवा नातेवाईकांसोबत पैशांची देवाणघेवाण टाळावी लागेल.
कर्क : व्यवसाय करणाऱ्या लोकांना भागीदारीतून सहकार्य मिळेल. ऑफिसमध्ये जास्त काम केल्यामुळे संध्याकाळी थकवा जाणवेल. गूढ गोष्टी जाणून घ्याल. भावनेला आवर घालावी लागेल. अति विचार करत बसू नका. आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही.
सिंह : कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहू शकते, कारण कुटुंबात काही मतभेद निर्माण होऊ शकतात. मनातील कडवटपणा दूर होईल. काही नवीन मार्ग सापडतील. जनसंपर्कात वाढ होईल.आज तुम्हाला व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे.
कन्या : जर तुम्ही आज व्यवसायात असाल तर कोणत्याही प्रकारच्या पैजे पासून दूर राहावे लागेल. खोटी स्तुति करणार्यांपासून सावध राहावे. आपले निर्णय आपणच घ्यावेत. आज तुम्हाला तुमच्या भावांकडून काही मिळू शकते. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे.
तूळ : आज सहलीला जायचे असेल तर विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न फळ देतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वातावरण सकारात्मक राहील. तुम्हाला जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
वृश्चिक : कुटुंबासमवेत फिरायला जाल. दिवस आनंदात घालवाल. आज काही रक्कम गुंतवणूकीवर खर्च करु शकता. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मित्रांचे गैरसमज झाल्याने आपण व्यथित व्हाल. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल.
धनू : आज काही प्रतिकूल परिस्थितीमुळे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्यात तुम्ही अपयशी ठराल. कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पहायला मिळतील. भावंडांशी संबंध सुधारतील. आजचा दिवस आनंददायी व समाधान मिळवून देणारा आहे.
मकर : आज तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तर त्यात कोणताही ताण घेऊ नका. व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी मिळाली तर ती मनापासून करा. बोलण्यात गोडवा राखून कामे करून घ्याल. आळस झटकावा लागेल. आजचा दिवस व्यापार – व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे.
कुंभ : आजचा दिवस मानसिक अशांतता व उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. आज समाधानाला अधिक महत्त्व द्याल. ध्यान धारणेला प्राधान्य द्यावे. आजचा दिवस मानसिक अशांतता व उद्विग्नता यांनी भरलेला असेल.
मीन : आज नोकरी – व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. परदेशी भाषा शिकण्याची आवड निर्माण होईल. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.